नेरलातील अवैध धंद्याच्या उच्चाटनासाठी महिलांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:42 AM2021-09-10T04:42:19+5:302021-09-10T04:42:19+5:30
अडयाळ : जवळील नेरला गावात गेली आठ वर्षे आधी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतमध्ये ठराव घेऊन गावातील दारू हद्दपार केली होती. पण ...
अडयाळ : जवळील नेरला गावात गेली आठ वर्षे आधी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतमध्ये ठराव घेऊन गावातील दारू हद्दपार केली होती. पण मागील तीन वर्षांपासून गावात हळूहळू पुन्हा दारूचा महापूर वाहू लागला आहे. यासाठी मागील दोन महिन्यांत मासिक सभेत गावातील दारू विक्री पूर्ण बंद करण्याचा ठराव घेऊन महिला ग्रामस्थांची एक समिती तयार करण्यात आली व त्यांनी तीन दिवसांत तीनदा अडयाळ पोलिसांना दारू पकडून दिली व तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आले. एकंदरीत नेरलात अवैध धंद्याच्या उच्चाटनासाठी महिलांचा एल्गार पुकारला आहे.
या कारवाई दरम्यान महिला समिती, तंटामुक्त समितीअध्यक्ष, सरपंच व पोलीसपाटील तथा ग्रामस्थ उपस्थित होते.
नेरला महिला ग्रामवासी तथा ग्रामवासी यांनी गेली तीन दिवसांत तीन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जेव्हा दारू पकडली. पोलिसांच्या स्वाधीन केले. आणि गावात अवैध व्यवसाय करणाऱ्यांना एक निर्वाणीचा इशारा दिला आहे. गावात सर्व करा, पण अवैध व्यवसाय बंद करून गावातील शांतता कायम ठेवा, असा सूर व्यक्त करण्यात आला आहे. अडयाळ पोलीस स्टेशन हद्दीतील गावात ठीक ठिकाणी अवैध व्यवसायाला ऊत आलेला दिसून येतो आहे. याला आळा बसण्याची नितांत आवश्यकता आहे.
अडयाळ पोलीस स्टेशन येथील ठाणेदार असोत वा बिट जमादार यांना छोट्या गावातील अवैध धंदे बंद करतांना अपयश का येतो? हाही एक मोठा प्रश्न आहे. अडयाळ पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात होत असल्याचे बोलले जात आहे. नेरला महिला ग्रामस्थांनी नेरला येथे बुधवार रात्रीच्या सुमारास दारू पकडली तो खोका सील बंद होता. त्यात संत्रा टायगर ब्रॅण्ड असंही लिहलं होता. पण महत्त्वाचे म्हणजे कोणत्या दारू दुकानातून तो खोका आणला गेला? यावर कुणीही बोलायला तयार नाहीत.