महिला सक्षमीकरण योजनेला चालना देणार

By admin | Published: December 20, 2015 12:30 AM2015-12-20T00:30:44+5:302015-12-20T00:30:44+5:30

महिलांच्या अनेक समस्या आहेत. सार्वजनिक जीवन जगताना त्यांना असलेल्या समस्यांवर खुल्या मनाने चर्चा करता येत नाही.

Women's empowerment scheme will be encouraged | महिला सक्षमीकरण योजनेला चालना देणार

महिला सक्षमीकरण योजनेला चालना देणार

Next

उद्घाटन समारंभ : नाना पटोले यांचे प्रतिपादन
वरठी : महिलांच्या अनेक समस्या आहेत. सार्वजनिक जीवन जगताना त्यांना असलेल्या समस्यांवर खुल्या मनाने चर्चा करता येत नाही. निर्सगाने ठरवून दिलेल्या अनेक अडचणी येतात. यामुळे महिलांचे सशक्तीकरण झाले पाहिजे. महिला सबलीकरणाकरीता प्रयास संस्थेने उचलले पाऊल वाखाणण्याजोगे आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात या प्रकाराच्या सामाजिक कार्यात मदत करून सक्षम महिला सक्षम राष्ट्र उभारण्यात चळवळींना चालना देण्याचे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.
भंडारा रोड रेल्वे स्टेशनवर प्रयास बहुउद्देशिय संस्थाच्या वतीने सेनेटरी नॅपकीन मशिन लावण्यात आली. या मशिनचे लोकार्पण खा. नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्ष म्हणून रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी अखिलेश शाहु, तनम्य मुखोपाध्याय, सरपंच संजय मिरासे, सखी मंच संयोजिका संगिता सुखानी, प्रयास बहुउद्देशिय संस्थेच्या सुचिता आगाशे, स्टेशन मास्टर कल्याण रामटेके, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सेवक कारेमोरे, निलम हलमारे उपस्थित होते. यावेळी खा. नाना पटोले यांनी भंडारा रोड रेल्वे स्टेशनवर असलेल्या सुविधांचा आढावा घेतला. भंडारा रोड रेल्वे स्टेशनचा समावेश मॉडल रेल्वे स्टेशन म्हणून करण्यात आला आहे लवकरच दोन्ही फलटावर चार प्रवाशी शेड, पिण्याच्या पाण्याचे नळ, शौचालय, सुरक्षा आणि रेल्वे फलाटावर दुरूस्ती करून नवीन टाईल्सचे काम सुरू होणार असल्याचे रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले.
सरपंच संजय मिरासे व रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सेवक कारेमोरे यांनी भंडारा रोड रेल्वे स्थानकावर असलेल्या असुविधा आणि त्यावर याबद्दल माहित दिली व गावकऱ्यांकरीता लवकरात लवकर फुट ओवर ब्रिज बनवण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी केली. प्रास्ताविक व आभार सुचिता आगाशे यांनी केले. नवप्रभात कन्या हायस्कूलच्या विद्यार्थीनी व शिक्षिका उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य मनिषा मडामे, चांगदेव रघुते, आकाश काकडे, मिलिंद धारगावे, डॉ. आर.के. सिंग, निशा मिश्रा, प्रतिभा लांबट, रेखा बावनकर, कविता वरठे, ललीता चोपकर, प्रणिता सुखानी, विलास काकडे, रमेश लांबट, रमेश तितीरमारे उपस्थित होते. (वार्ताहर)

जनजागरण मोहीम सुरू करणार
महिलांच्या विविध समस्या असतात. त्यामुळे त्या सार्वजनिकरित्या सांगता येत नाही. महिलांना प्रवास करताना समस्या उद्भवल्यास त्यांना त्रास होवू नये म्हणून सदर योजना प्रयास संस्थेने सुरू केली आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात विविध सार्वजनिक ठिकाणी सध्या ९ सेनेटरी नैपकीन मशिन लावणार असून लवकरच जिल्ह्यात व्यसनाच्या आहारी गेलेल्या विद्यार्थ्याकरीता जनजागरण मोहीम सुरू करणार असल्याचे प्रयास संस्थेच्या सुचिता आगाशे यांनी सांगितले.

Web Title: Women's empowerment scheme will be encouraged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.