दारुबंदीसाठी महिलांचा मोर्चा

By Admin | Published: September 16, 2015 01:22 AM2015-09-16T01:22:37+5:302015-09-16T01:22:37+5:30

लाखनी तालुक्यातील सालेभाटा या छोट्याशा गावात महिनाभरापासून दारुबंदीचे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

Women's Front for Alcoholics | दारुबंदीसाठी महिलांचा मोर्चा

दारुबंदीसाठी महिलांचा मोर्चा

googlenewsNext

सालेभाटा येथे महिला सरसावल्या : महिलांची उपस्थिती लक्षणीय
सालेभाटा : लाखनी तालुक्यातील सालेभाटा या छोट्याशा गावात महिनाभरापासून दारुबंदीचे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. आज मंगळवारला गावातून शेकडो महिलांनी मोर्चाद्वारे दारुबंदीची मागणी केली.
सामाजिक कार्यकर्ते नरेश बोपचे व ग्रामपंचायत सदस्य कैलाश भगत, ओमप्रकाश पटले यांच्या नेतृत्वात सकाळी ११ वाजता गावातील प्रमुख मार्गांनी घोषणा देत मोर्चा काढण्यात आला. ज्ञानेश्वर नगरमधून निघालेल्या मोर्चाची सांगता बसस्थानक चौकात करण्यात आली.
मुलाबाळांचे भवितव्य, महिलांचे सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्य, तंटामुक्ती एकूणच सर्वांगीण ग्रामविकासाच्या हेतूने हे आंदोलन २० आॅगस्टपासून सुरु करण्यात आले आहे. ग्रामसभेत घेतलेला ठराव जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागांना देण्यात आला आहे.
दारुबंदीच्या जनजागृतीसाठी ३० सप्टेंबरला जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी माजी जि.प. सदस्य मोरेश्वरी पटले, आंदोलन समितीचे अध्यक्ष जयश्री कोहळे, सचिव ओमेश्वरी पटले, उपाध्यक्ष अस्मिता बोपचे, शालू वाघमारे, नाशिका भगत, नोशन बोपचे, सुनिता राहांगडाले आदींची भाषणे झाली. या मोर्चात ग्रामपंचायत, महिला बचत गट व महिलाशक्ती दारुबंदी समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Women's Front for Alcoholics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.