पाठ्यपुस्तकातून ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द वगळले

By admin | Published: May 6, 2016 12:36 AM2016-05-06T00:36:34+5:302016-05-06T00:36:34+5:30

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या हिंदी सुगम भारती पुस्तकात असलेले ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द वगळून त्याऐवजी ‘पंथनिरपेक्ष’ हा शब्द प्रयोग केला आहे.

The word 'secular' has been omitted from the textbook | पाठ्यपुस्तकातून ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द वगळले

पाठ्यपुस्तकातून ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द वगळले

Next

पंथनिरपेक्ष नवा शब्दप्रयोग : गुन्हा दाखल करण्याची बसपाची मागणी
भंडारा : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या हिंदी सुगम भारती पुस्तकात असलेले ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द वगळून त्याऐवजी ‘पंथनिरपेक्ष’ हा शब्द प्रयोग केला आहे. याचा बहुजन समाज पार्टीच्यावतीने निषेध करण्यात आला आहे. यासाठी जबाबदार अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बसपाचे जिल्हाध्यक्ष त्र्यंबक घरडे यांनी केली आहे.
इयत्ता सहावी व आठवीच्या पुस्तकात करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या हिंदी सुगम भारती पुस्तकात हा प्रकार उघडकीस आला आहे. संविधानाचे जतन करण्याची, सुरक्षा करण्याची नैतिक जबाबदारी शासनाची आहे. पण भाजप सरकार किंवा त्यांचे पदाधिकारी, अधिकारी असा प्रकार मुद्दाम करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
भारत धर्मनिरपेक्ष असल्याचे संविधानाच्या उद्देशीकेत नमुद आहे. संघ आणि भाजपाचे विविध संघटनांचे पदाधिकारी संविधान समीक्षा करण्याचे भाष्य करीत आहेत. त्यात धर्मनिरपेक्षऐवजी पंथनिरपेक्ष करून त्यांनी षडयंत्र रूजविण्याचा घाट घातला आहे.
संघाचे हे संविधान विरोधी कृत्य जनताच हाणून पाडणार आहे. पाठ्यपुस्तकातील संविधान उद्देशिकेतील धर्मनिरपेक्ष शब्द वगळून त्याऐवजी पंथनिरपेक्ष शब्द प्रयोग केल्याने याचा बसपा निषेध करीत असून यासाठी जबाबदार अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही घरडे यांनी केली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The word 'secular' has been omitted from the textbook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.