लाखनी तालुक्यात रोहयोअंतर्गत १२ हजार मजुरांना काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 05:00 AM2020-05-15T05:00:00+5:302020-05-15T05:00:28+5:30

विविध शहरातून गावाकडे परतलेल्या मजुरांना शासन आदेशाप्रमाणे फिजीकल डिस्टन्सिंगचा वापर करीत कोरोनाबाबत उपाययोजना राबविण्यात येत आहे. बंधाऱ्याचे गाळ काढणे, खोलीकरणाचे काम करणे तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरु झाले आहेत.

Work for 12,000 laborers under Rohyo in Lakhni taluka | लाखनी तालुक्यात रोहयोअंतर्गत १२ हजार मजुरांना काम

लाखनी तालुक्यात रोहयोअंतर्गत १२ हजार मजुरांना काम

Next
ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे कामाला गती : फिजीकल डिस्टन्सिंगचा वापर, ३३१ कामांना सुरूवात

चंदन मोटघरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : कोरोना संकटामुळे मजुरांना काम उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने आदेश दिले आहेत. या अंतर्गत स्थानिक पंचायत समितीस्तरावर महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत लाखनी तालुक्यात ३३१ कामे सुरु करण्यात आली असून या कामांवर १२ हजार ७० मजुरांनी उपस्थिती दर्शविली आहे.
तालुक्यात मालगुजारी तलावाचे खोलीकरणाचे २२ कामे, भातखाचरे ४३ कामे, घरकुलाची २६५ व गोठा बांधकामाचे एक काम सुरु करण्यात आले आहे. लॉकडाऊनमध्ये ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम उपलब्ध झाल्याने मजूर वर्गातून आनंद व्यक्त होत आहे. विविध शहरातून गावाकडे परतलेल्या मजुरांना शासन आदेशाप्रमाणे फिजीकल डिस्टन्सिंगचा वापर करीत कोरोनाबाबत उपाययोजना राबविण्यात येत आहे. बंधाऱ्याचे गाळ काढणे, खोलीकरणाचे काम करणे तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरु झाले आहेत. तालुक्यातील ७१ ग्रामपंचायती अंतर्गत ८६ हजार मजूरसंख्या आहे. प्रत्येक गावातील मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्याचा पंचायत समितीस्तरावर प्रयत्न केला जात आहे.
तालुक्यात मालगुजारी तलावाच्या खोलीकरण, सामेवाडा ३९९, गराडा ५४४, रेंगेपार कोहळी ४५०, धाबेटेकडी ४५८, मांगली २५०, डोंगरगाव न्याहारवानी १७५, मोगरा ६५४, घोडेझरी २६९, देवरी २९९, खराशी ३१५, मासलमेटा ५४३, परसोडी ५०३, मुरमाडी तुप. ७००, कन्हाळगाव २९०, शिवणी ५९०, मिरेगाव ५४५, धानला २९०, किन्ही २७५ अशी तालुक्यातील कामांवर मजुरांची उपस्थिती आहे. बंधाºयातील गाळ काढण्याच्या कामावर खैरी येथे ४४० तर सेलोटी येथे ७००, केसलवाडा वाघ ९३१, निलागोंदी ५३७ असे कामांवर मजूर कामावर उपस्थित आहेत. भातखाचरांच्या कामावर इसापूर ३३, गुरठा ३०, रेंगोळा २०, मांगली १८, लाखोळी ११६, सालेभाटा ३५०, सावरी ३२, किटाडी १८, कवलेवाडा १२, कोलारी ४८, केसलवाडा २०, मुरमाडी ३०, झरप २०, डोंगरगाव ३५, दैतमांगली ३२, चान्ना ३१ अशा प्रकारे तालुक्यातील ४३ कामांवर ८४५ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी कामाच्या ठिकाणी कठोर नियमांची अंमलबजावणी करीत आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. उन्हाचा तडाखा वाढला असल्याने मजुरांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन तालुका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी मजुरांनी मास्क ऐवजी रुमालाचा वापर करावा, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे रोहयो कामे सुरु झाली असून होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींना व त्याच्या कुटुंबियांना कामावर न ठेवण्याच्या सूचना आहेत. क्वारंटाईन झालेला व्यक्ती १५ व्या दिवशी रोहयो कामावर उपस्थित राहू शकतो.
-डॉ.शेखर जाधव, खंडविकास अधिकारी, पंचायत समिती लाखनी.

Web Title: Work for 12,000 laborers under Rohyo in Lakhni taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Labourकामगार