कामबंद आंदोलन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:57 AM2018-04-13T00:57:14+5:302018-04-13T00:57:14+5:30

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात कार्यरत कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहा महिन्यांचे पुनर्नियुक्ती आदेश देण्याच्या प्रक्रियेला विरोध करून सुरू केलेले कामबंद आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. त्यामुळे आरोग्यसेवा प्रभावित होण्याची शक्यता बळावली आहे.

Work on the agitated movement | कामबंद आंदोलन सुरूच

कामबंद आंदोलन सुरूच

Next
ठळक मुद्देसंघटनांचा पाठिंबा : आरोग्य सेवा प्रभावित होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात कार्यरत कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहा महिन्यांचे पुनर्नियुक्ती आदेश देण्याच्या प्रक्रियेला विरोध करून सुरू केलेले कामबंद आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. त्यामुळे आरोग्यसेवा प्रभावित होण्याची शक्यता बळावली आहे.
दरम्यान, या आंदोलनाला आज आणखी काही संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. या कामबंद आंदोलनात जिल्हाभरातील ५४० कंत्राटी कर्मचारी सहभागी झाल्याने आरोग्यसेवेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी यांनी मंडपाला भेट देऊन संघटनेचे पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ११ महिण्याचे पुनर्नियुक्ती आदेश देण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्या रेटून धरल्या. यावेळी डॉ.भंडारी यांनी आंदोलकांच्या मागण्या सोडविण्यासाठी राज्यस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. मात्र राज्यस्तरावर या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत समाधानकारक तोडगा निघू न शकल्याने आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. राज्यस्तरावरून कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात शासनाने ठोस निर्णय घेऊन मागण्या मान्य न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा ईशारा भंडारा जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
राज्यभरात राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघांच्यावतीने कामबंद आंदोलनात तालुका ते जिल्हास्तरापर्यंत कार्यरत अधिकारी कर्मचारी एकजुटीने सहभागी झाले आहेत. आरोग्य सेवेत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये नर्स, आरोग्यसेविका, आरोग्य सहायका, गटप्रवर्तक, वैद्यकीय अधिकारी जिल्हास्तरावरील अधिकारी व कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. माजी आमदार मधुकर कुकडे, सभापती रेखा ठाकरे यांनी मंडपाला भेट देऊन कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी सर्वसाधारण सभेत ठराव घेण्याचे आश्वासन दिले. डॉ. प्रशांत उईके, डॉ.माधुरी माथुरकर, डॉ. किशोर चाचरकर, डॉ. रविंद्र वानखेडे, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ.गोयल, डॉ.निखील डोकरीमारे, राष्ट्रवादीचे देवचंद ठाकरे, शैलेश मयुर यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून पाठिंबा दर्शविला आहे.

Web Title: Work on the agitated movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.