कृषिउत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 12:42 AM2019-03-01T00:42:40+5:302019-03-01T00:43:47+5:30
कृषिउत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करावे, या मुख्य मागणीला घेवून राज्यभरातील बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. परिणामी भंडारा जिल्ह्यातील चारही बाजार समित्यांसह उपबाजार समित्यांचे कामकाज ठप्प पडले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कृषिउत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करावे, या मुख्य मागणीला घेवून राज्यभरातील बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. परिणामी भंडारा जिल्ह्यातील चारही बाजार समित्यांसह उपबाजार समित्यांचे कामकाज ठप्प पडले आहेत. मुंबई येथील आझाद मैदानात सुरु असलेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील ४२ कर्मचारी सहभागी झाले आहेत.
राज्यात ३०७ कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ६८७७ कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत इतर राज्याप्रमाणेच सामावून घ्यावे या मागणीला घेऊन बाजार समितीचा कर्मचारी संघटनेने लढा पुकारला आहे. मागण्यांची पुर्तता करण्यासाठी शासनाने अभ्यास समितीही गठीत केली आहे. यासंदर्भात २० नोव्हेंबर २०१७ रोजी शासनाला अहवाल सादर करण्यात आला. १० जानेवारी २०१८ रोजी पणनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कर्मचाºयांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली. मात्र त्यानंतर माशी कुठे शिंकली कुणाच ठाऊक. कर्मचाºयांचा हिताचा निर्णय अडगळीत पडला. ३१ आॅक्टोबर २०१८ रोजी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात शासनाने भाजीपाला नियमन मुक्ती, मार्केट यार्डच्या बाहेरील धान्य नियमन मुक्तीचा निर्णय घेतला असून बाजार समितीचा सेस बंद करुन सेवाशुल्क आकारणी भरण्याबाबत निर्णय घेण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे बाजार समित्या बंद पडतील. काही बाजार समिती कर्मचाºयांचे १० ते २० महिन्यांपासून वेतन झाले नाही.
तेलंगणा व तामिळनाडू राज्यातील बाजार समित्यांच्या कर्मचाºयांप्रमाणे राज्यातील बाजार समिती कर्मचाºयांना शासन सेवेत सामावून घ्यावे, अशी या कर्मचाºयांची मुख्य मागणी आहे.
भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, लाखनी व पवनी येथील मुख्य बाजार समितीचे कामकाज ठप्प पडले आहेत. याचा सरळसरळ फटका शेतकºयांना बसत आहे. प्रशासनीक कामेही पुर्णत: ढेपाळली आहेत. भंडारा जिल्ह्यातून आंदोलनात सहभागी होऊन कर्मचाºयांनी वरिष्ठांना निवेदन दिले. यावेळी भंडारा येथील सागर सार्वे, दिलीप गोन्नाडे, मंगेश चौधरी, विनोद तिडके, गजानन राठोड, राहूल बडोले, पवनी येथील सतीश तलमले, विनोद गायधने, देवानंद सुखदेवे, सुनिल गिरीपुंजे, तिलक करंजेकर, सुनिल पचारे, नरेश मडावी, वनवास कांबळी, तुमसर येथील रविकांत अवथरे, अनिल भोयर, धनपाल बिसने, हलमारे, लक्ष्मीकांम कोकोडे, सुरेश बोंद्रे, महेंद्र चौरीवार, अविनाश दुपारे, आशिष चौरे, भोजराज हारगुळे, मुकूल वासनिक, राजु बुराडे, लाखनी येथील संजय पारोडे, स्वप्नील गायधने, लोकेश मोटघरे, धनंजय बावनकुळे, किशोर भैसारे, चैतन्य वंजारी, विनोद तरोणे, बाळकृष्ण भोयर, गजानन मडावी यांच्यासह महिला कर्मचाºयांचा समावेश आहे.