ब्रिटिशकालीन तुमसर तिरोडी दुहेरी रेल्वे ट्रॅकचे काम थंड बस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:36 AM2021-01-23T04:36:18+5:302021-01-23T04:36:18+5:30
तुमसर तिरोडी हे अंतर ४५ किलोमीटरचे आहे. या मार्गावर रेल्वेस्थानक असून, त्यांची निर्मिती ब्रिटिशांनी केली होती. तिरोडी ...
तुमसर तिरोडी हे अंतर ४५ किलोमीटरचे आहे. या मार्गावर रेल्वेस्थानक असून, त्यांची निर्मिती ब्रिटिशांनी केली होती. तिरोडी ते कटंगी या अकरा किलोमीटरच्या रेल्वे ट्रॅकचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मागील दहा वर्षापासून सदर रेल्वे ट्रॅकचे काम सुरू आहे. कटंगी ते बालाघाट व थेट जबलपूरकरिता हा रेल्वे मार्ग पुढे जातो. उत्तर भारतात जाण्याकरिता हा एकमेव रेल्वेमार्ग असून, हा रेल्वे मार्ग प्रवाशांना स्वस्त व सोयीचा ठरतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तुमसर तिरोडी रेल्वेमार्ग दुहेरी करण्याच्या प्रस्तावाला हिरवी झेंडी दिली होती. सातपुडा पर्वत रांगातून हा रेल्वेमार्ग जात असल्याने रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूला राखीव जंगल आहेत. काही ठिकाणी टेकड्या आहेत, त्यामुळे वन विभागाची परवानगी व पर्यावरण विभागाने येथे हरकत घेतल्याची माहिती आहे. राज्य शासनाने येथे दखल घेऊन दुहेरी रेल्वेमार्गाचा तिढा सोडवण्याची गरज आहे.