प्रथमच काम करतोय, या भावनेने कार्य करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 09:23 PM2018-02-22T21:23:53+5:302018-02-22T21:24:27+5:30
ऑनलाईन लोकमत
भंडारा : दीर्घकाळाचा अनुभव अनेकांच्या पाठीशी आहे. अनुभव असल्यास डोक्यात शिरलं की गफलत होते. त्यातून चुका होण्याची शक्यता असते. परीक्षेचे काम सहजतेने होण्यासाठी आपण प्रथमच काम करतोय या भावनेने कार्य केल की, पुढे भानगडी पासून दूर राहता येईल, असे प्रतिपादन नागपूर विभागीय मंडळाचे सहायक सचिव संजय आयलवार यांनी केले.
लाल बहादूर शास्त्री विद्यालय भंडारा येथे दहावीच्या केंद्र संचालक, सहायक परिरक्षक यांची सभा घेण्यात आली. परीक्षेचे बदलते स्वरूप याविषयी माहिती देताना संजय आयलवार यांनी सांगितले. यावेळी मोहाडी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रमेश गाढवे, प्राचार्य दत्तात्रय देशमुख यांची उपस्थिती होती. दहाविची परीक्षा १ मार्चपासून सुरू होत आहे. भंडारा जिल्ह्यात दहाविचे ८९ परीक्षा केंद्र आहेत. या परीक्षा केंद्रावर २० हजार ४३० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. ९ परीरक्षक केंद्र ठेवण्यात आले आहे. अतिरिक्त केंद्र संचालक या ऐवजी सहायक परिरक्षक असे नामानिधान करण्यात आले. दहाविच्या परीक्षा केंद्रावर दररोज सहायक परिरक्षकांना फिरते ठेवले जाणार आहे. प्रत्येक तालुक्यातील कस्टोडियन केंद्रावर अतिरीक्त सहायक परिरक्षक नेमण्यात आले आहेत. यावेळी एखाद्या सहायक परिरक्षकाला परीक्षा केंद्रावर जाण्याची संधी मिळणार नाही. त्यामुळे वाईट वाटून घ्यायचे नाही, असेही संजय यावलवार म्हणाले, केंद्र संचालकांना सहकार्य करा. गैरमार्ग प्रकरण होवू नयेत यासाठी काटेकोरपणे व्यवस्था सांभाळा. तरीही परीक्षेत गैरमार्ग प्रकरण झाले तर लगेच कस्टोडियन यांना कळवा. कस्टोडियन हे मंडळापर्यंत लगेच माहिती देणार आहेत. गैर मार्ग प्रकरणाची माहिती शासनाला मंडळ त्याचदिवशी कळविणार असल्याचेही सांगण्यात आले. दहाविची उत्तरपत्रिका २० पानांची आहे. त्या उत्तरपत्रिकेचा रंग निळसर आहे. केंद्रापर्यंत नवीन उत्तरपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. त्या उत्तर पत्रिकांना बारकोड दिला आहे. त्यामुळे जुन्या उत्तरपत्रिका वापरता येणार नाही. परीक्षा संपल्यावर उत्तरपत्रिकेचा हिशेब सादर करावा लागणार आहे. उत्तरपत्रिका शिल्लक नसल्याचे प्रमाणपत्र केंद्रसंचालकांना द्यावे लागणार आहे. पुरवणी चार पाणाची नव्याने देण्यात आली आहे. बैठक व्यवस्था केंद्रसंचालकांनी आपल्या सोयीनुसार केली तरी चालणार आहे. प्रश्नपत्रिकांचे लिफाफे केंद्र संचालक, सहायक परिरक्षक, विद्यार्थी व पोलीस यांच्या समोरच फोडले जावेत. प्रश्नपत्रिका वाटपाची प्रक्रिया जूनिच आहे.
विद्यार्थ्यांनी १०.३० वाजता परीक्षा दालनात घेण्यात यावे. ११ वाजता येणाऱ्या विद्यार्थ्यांस प्रवेश देवू नये. एखादा विद्यार्थी परीक्षा केंद्रावर उशिरा आला असल्यास त्याच्या उशिरा येण्याची कारणे जाणून घेण्यात येतील. त्यासाठी उशिरा येणाऱ्या परीक्षार्थ्यांसाठी वेगळा रजिस्टर केला जाणार आहे. उशिरा येणाºया विद्यार्थ्याला परीक्षा खोलीत पाठविण्यापुर्वी परीक्षा मंडळाशी केंद्रसंचालकांनी संपर्क साधला असता मंडळाशी संपर्क झाला नाही .