कारली उपकालव्याचे काम अपूणर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 10:02 PM2017-09-25T22:02:32+5:302017-09-25T22:02:46+5:30

तुमसर तालुक्यातील चिचोली, भोंडकी, जोगेवाडा, कारली येथील शेतकºयांना कारली उपकालव्याचा काम संत गतीने सुरू असल्यामुळे सिंचनाचा लाभ मिळाला नाही.

The work of the Karlai sub-work is incomplete | कारली उपकालव्याचे काम अपूणर्च

कारली उपकालव्याचे काम अपूणर्च

Next
ठळक मुद्देआंदोलनाचा इशारा : वर्षभरापासून प्रतीक्षा कायम

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनारा : तुमसर तालुक्यातील चिचोली, भोंडकी, जोगेवाडा, कारली येथील शेतकºयांना कारली उपकालव्याचा काम संत गतीने सुरू असल्यामुळे सिंचनाचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे मागील वर्षापासून दुष्काळाचा फटका या गावांना बसला. या हंगामात शेतकºयांना सिंचनाचा लाभ मिळाला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा डॉ. महेंद्र रहांगडाले यांनी दिला.
या संदर्भात डॉ. हरेंद्र रहांगडाले यांनी बवनथडी प्रकल्प विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांना प्रश्न केला की वर्ष लोटूनही चिचोली, जोगेवाडा, भोंडकी, कारली येथील शेतकºयांना बावनथडी प्रकल्पाच्या सिंचनाची सुविधा झाली नाही. त्यावर बावनथडी प्रकल्पाच्या अधिकाºयांनी थातूर मातूर उत्तर देत काम सुरू आहे, असे सांगितले. परंतु या कालव्याच्या कामावर कधी बंद जेसीबी आढळतात तर कधी टिप्पर नसतात त्यामुळे वर्ष लोटूनहीकारली उपकालव्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही व बावनथडीचे पाणी शेतकºयांना मिळाले नाही यावरून बावनथडी प्रकल्प विभाग किती सुस्त आहे, असे म्हणायला हरकत नाही.
डॉ. रहांगडाले यांच्या नेतृत्वात कारली उपकालव्याचे काम पूर्ण करण्याकरिता रस्ता रोको आंदोलन घेण्यात आले होते. त्यावर तहसीलदार यांच्या आदेशाप्रमाणे बावनथडी प्रकल्प विभागाने जून २०१७ अखेरपर्यंत चिचोली, जोगेवाडा, भोंडकी, कारली येथील शेतकºयांना कोणत्याही परिस्थितीत बावनथडी प्रकल्पाच्या सिंचनाची सुविधा करू असे लेखी आश्वासन दिले. परंतु बावनथडी प्रकल्प विभागाच्या भोंगळ कारभारामुळे कारली उपकालव्याचे काम वर्ष लोटूनही पूर्ण होऊ शकले नाही.
शेतकºयांची जमीन पडित राहिली तर काही शेतकºयांची सिंचनाअभावी पिके करपले व दुसºया वर्षी सुद्धा दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. शेतकरी चिंतातूर झालेला आहे. चिचोली, जोगेवाडा, भोंडकी, कारली येथील शेतकºयांची स्थिती पाहता डॉ. रहांगडाले यांनी, बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्ळाची मागणी केली आहे.

Web Title: The work of the Karlai sub-work is incomplete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.