हत्तीरोग निर्मूलनासाठी मिशन मोडवर काम करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:24 AM2021-07-02T04:24:44+5:302021-07-02T04:24:44+5:30

भंडारा : राज्यात हत्तीरोग निर्मूलनासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीम पंधरवडा १५ जुलैपर्यंत चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नांदेड आणि यवतमाळ ...

Work on mission mode to eradicate elephantiasis | हत्तीरोग निर्मूलनासाठी मिशन मोडवर काम करावे

हत्तीरोग निर्मूलनासाठी मिशन मोडवर काम करावे

Next

भंडारा : राज्यात हत्तीरोग निर्मूलनासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीम पंधरवडा १५ जुलैपर्यंत चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नांदेड आणि यवतमाळ या सहा जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार असून, त्याचा प्रारंभ गुरुवारी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झाला. महाराष्ट्रातून हत्तीरोग निर्मूलनासाठी यंत्रणांनी मिशन मोडवर काम करावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.

दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचा ऑनलाईन प्रारंभप्रसंगी आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामास्वामी, संचालक डॉ. अर्चना पवार यांच्यासह भंडारा येथून जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. एस. फारुकी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आदिती त्याडी उपस्थित होते.

राज्यातील १८ जिल्हे हत्तीरोग प्रवण जिल्हे म्हणून ओळखले जायचे. त्यापैकी जळगाव, सिंधुदुर्ग, लातूर, अकोला, नंदुरबार, सोलापूर, उस्मानाबाद, अमरावती, ठाणे, पालघर, नागपूर आणि वर्धा या बारा जिल्ह्यांमध्ये सामुदायिक औषधोपचार मोहीम यशस्वीपणे राबविल्यामुळे या जिल्ह्यांमध्ये आता ही मोहीम बंद करण्यात आली आहे. सध्या उर्वरित सहा जिल्ह्यांमध्ये ही मोहीम गुरुवारपासून १५ जुलैपर्यंत राबविली जाणार आहे.

भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नांदेड व यवतमाळ या सहा जिल्ह्यांमध्ये ८०९८ गावांमधील एक कोटी तीन लाख लोकांना हत्तीरोग विरोधी गोळ्या सेवन करण्यासाठीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. या सहाही जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी समन्वय समितीच्या सभा घेतल्या असून, नागरिकांना गोळ्या वाटपासाठी ४१ हजार ३५२ कर्मचारी व ४१३५ पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून मिशन मोडवर ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले. यावेळी आरोग्य मंत्र्यांनी डॉक्टर दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.

Web Title: Work on mission mode to eradicate elephantiasis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.