समाजातील शोषित, पीडित लोकांसाठीचे संघटनेचे कार्य उल्लेखनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:37 AM2021-08-23T04:37:19+5:302021-08-23T04:37:19+5:30

दलित पँथर संघटना काम करीत आहे. पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या पावलावर पाऊल ठेवून व त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन ...

The work of the organization for the exploited and oppressed people in the society is remarkable | समाजातील शोषित, पीडित लोकांसाठीचे संघटनेचे कार्य उल्लेखनीय

समाजातील शोषित, पीडित लोकांसाठीचे संघटनेचे कार्य उल्लेखनीय

Next

दलित पँथर संघटना काम करीत आहे. पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या पावलावर पाऊल ठेवून व त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन संघटना वाढीसाठी कार्य सुरू असल्याचे प्रतिपादन दलित पँथर संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. घनश्याम भोसले यांनी केले.

मोहाडी तालुक्यातील आंधळगाव येथील जिल्हा परिषद महाविद्यालयात दलित पँथर संघटनेची भंडारा जिल्ह्याची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी बैठकीसाठी दलित पँथरचे भंडाराचे जिल्हाध्यक्ष राहुल वानखेडे, श्रीकांत येरपुडे, राजू मते, प्रदीप बुराडे , जिल्हा महिला प्रदेशाध्यक्षा कविता भोंदे यांची भाषण झाली. अध्यक्षीय भाषणात डॉ. भोसले यांनी संघटनेच्या राज्यभरातील कार्याचा आढावा घेतला. दलित पँथरचे जिल्हाध्यक्ष राहुल वानखेडे यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आज पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या विचारांची गरज असून कोरोनानंतर सर्वसामान्य लोकांच्या अडचणी वाढल्या असून संघटना अशा लोकांसाठी सदैव कार्य करेल असे आश्वासन दिले. डॉ. प्रज्ञाशील रोडगे यांनी उपस्थित लोकांना चळवळीविषयी माहिती दिली. कार्यक्रमाला अरविंद कारेमोरे, आकाश बोंदरे, अजेश मेश्नाम.................., सरपंच गणेश गोरे, लक्ष्मण उके, विजय फुले, हरबा महाराज, मुख्याधापक ईटनकर, नारनवरे, चक्रधर, मेश्राम हजर होते. संचालन अमित खोब्रागडे यांनी केले तर आभार सुखदेवे यांनी मानले.

Web Title: The work of the organization for the exploited and oppressed people in the society is remarkable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.