सर्व्हिस रोडपूर्वी सुरू झाले उड्डाणपुलाचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 11:31 PM2019-01-29T23:31:13+5:302019-01-29T23:31:31+5:30

सर्व्हीस रोडचे काम पूर्ण न करता उड्डाणपुलाच्या कामाला प्रारंभ करण्याचा अफलातून प्रकार राष्ट्रीय महामार्गावरील लाखनी ते सौंदड दरम्यान दिसून येत आहे. यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली असून साकोलीत तर वाहतुकीची कोंडी होत आहे. या सर्व प्रकाराकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष आहे.

The work started on the flyover before the service road | सर्व्हिस रोडपूर्वी सुरू झाले उड्डाणपुलाचे काम

सर्व्हिस रोडपूर्वी सुरू झाले उड्डाणपुलाचे काम

Next
ठळक मुद्देअपघाताची भीती : साकोली शहरात वाहतुकीची कोंडी

संजय साठवणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : सर्व्हीस रोडचे काम पूर्ण न करता उड्डाणपुलाच्या कामाला प्रारंभ करण्याचा अफलातून प्रकार राष्ट्रीय महामार्गावरील लाखनी ते सौंदड दरम्यान दिसून येत आहे. यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली असून साकोलीत तर वाहतुकीची कोंडी होत आहे. या सर्व प्रकाराकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर लाखनी ते सौंदड पर्यंत उड्डाणपुल तयार करण्यात येणार आहे. वाढते अपघात व वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी उड्डाणपुल बांधले जाणार आहे. गत दोन महिन्यांपासून या उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली. लाखनी आणि साकोली येथे राष्ट्रीय महामार्गाच्या मधोमध मोठाले खड्डे खोदून काम सुरु झाले आहे. यासाठी मोठाली यंत्रसामुग्रीही कामाला लावली आहे. या यंत्राच्या सहाय्याने काम सुरु आहे. चार पदरी महामार्ग आता यामुळे शहरात दुपदरी होणार आहे. काम सुरु असताना सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करणे आवश्यक आहे. परंतु येथे कोणत्याही उपाययोजना दिसत नाही. पिलरसाठी खोदलेल्या खड्ड्यालगत वाहतूक सुरु आहे. विशेष म्हणजे काम सुरु करण्यापूर्वी दोन्ही बाजूची वाहतूक सर्व्हीस रोडने करणे गरजेचे आहे. मात्र तसे येथे होत नाही. कधीकधी वाहतूक सर्व्हीस रोडने केली जाते. परंतु सर्व्हीस रोडवर वाहने, भाजीपाला दुकाने आणि इतर दुकाने गर्दी करून असतात. त्यामुळे येथे वाहतुकीची कोंडी होते. एकंदरीत उड्डाणपुलाचे काम म्हणजे साकोलीवासीयांसाठी एकप्रकारे डोकेदुखीच झाली आहे. सर्व्हीस रोडने वाहतूक सुरु न केल्यास एखाद दिवशी भीषण अपघात होण्याची शक्यता आहे.
महसूल व पोलीस प्रशासन गप्प
गत दोन महिन्यांपासून राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरु असून एकेरी वाहतूक सुरु आहे. यामुळे वाहतुकीला अडचण निर्माण होऊन नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. मात्र महसूल आणि पोलीस प्रशासन गप्प दिसत आहे. एखादा मोठा अपघात होऊन कुणाला प्राण गमवावे लागले तर जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: The work started on the flyover before the service road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.