विधानसभा निवडणुकीसाठी एकजुटीने कामाला लागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 10:33 PM2019-07-01T22:33:25+5:302019-07-01T22:33:42+5:30

लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा झालेला पराभव आपल्याला मान्य नाही. प्रत्येक कार्यकर्त्याने व पदाधिकाऱ्याने इमाने इतबारे काम केल्याची ग्वाही मी स्वत: देतो. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत एकजुटीने कामाला लागा. सत्ता असो वा नसो भंडारा-गोंदिया जिल्ह्याकडे माझे लक्ष असते, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी येथे केले.

Work united for assembly elections | विधानसभा निवडणुकीसाठी एकजुटीने कामाला लागा

विधानसभा निवडणुकीसाठी एकजुटीने कामाला लागा

Next
ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : साकोली येथे भंडारा व गोंदिया जिल्हा राष्ट्रवादीचा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा झालेला पराभव आपल्याला मान्य नाही. प्रत्येक कार्यकर्त्याने व पदाधिकाऱ्याने इमाने इतबारे काम केल्याची ग्वाही मी स्वत: देतो. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत एकजुटीने कामाला लागा. सत्ता असो वा नसो भंडारा-गोंदिया जिल्ह्याकडे माझे लक्ष असते, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी येथे केले.
भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा संयुक्त मेळावा साकोली येथील मंगलमुर्ती सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री नाना पंचबुद्धे, जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, माजी खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार राजू जैन, माजी आमदार अनिल बावनकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, गोंदिया जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष पंचम बिसेन, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, मनोहर चंद्रीकापुरे, धनंजय दलाल, नरेश माहेश्वरी, धनेंद्र तुरकर, अभिषेक कारेमोरे, दामाजी खंडाईत, विवेकानंद कुर्झेकर, रामलाल चौधरी, यशवंत सोनकुसरे, मनोज डोंगरे, रेखा ठाकरे, किशोर तोरणे, दिलीप बन्सोड, आदी उपस्थित होते.
खासदार पटेल म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आपण कोठेही कमी पडलो नाही. कार्यकर्त्यानी आपसातील हेवेदावे बाजूला सारून तन, मन, धनाने काम करावे. भंडारा व गोंदिया माझे गृहजिल्हे आहे. त्यामुळे मी कुठेही असलो तरी प्रत्येक बाबीवर माझे लक्ष असते, असे त्यांनी सांगितले. येत्या विधानसभेत आघाडीच्या उमेदवारासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेले काँग्रेसचे चेतक डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला. संचालन जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केले तर आभार जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी मानले. मेळाव्याला राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Work united for assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.