कामगार मित्रांनो, कोविडपासून सुरक्षित राहून लसीकरणाचा लाभ घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:16 AM2021-05-04T04:16:00+5:302021-05-04T04:16:00+5:30
०३ लोक ०४ के भंडारा : कोरोना संकट सर्वदूर पसरले आहे. या संकटात प्रत्येक व्यक्तीने सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक ...
०३ लोक ०४ के
भंडारा : कोरोना संकट सर्वदूर पसरले आहे. या संकटात प्रत्येक व्यक्तीने सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. सामाजिक अंतर, स्वच्छता, मास्कचा वापर व योग्य आहार महत्त्वाचा आहे. दिवसातून ८ तास काम करीत उर्वरित वेळेत विश्रांती घेत कोविड संसर्गजन्य आजारापासून काळजी घ्यावी, असे आवाहन विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष व न्या पी. एस. खुणे यांनी बीटीबी सब्जी मंडी येथे आयोजित प्रबोधनात केले.
यावेळी मंचावर न. के. वाळके, जिल्हा सचिव विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, भंडारा, बीटीबी अध्यक्ष बंडू बारापात्रे, कामगार, व्यापारी, शेतकरी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, कामगारांनो नेहमी स्वच्छतेला अधिक महत्त्व द्या. आपण जिथे काम करतो तिथला परिसर स्वच्छ ठेवा. शेतकरी, व्यापारी, कामगार हे एकमेकाला पूरक आहेत. प्रत्येकाशी सकारात्मक, स्नेहपूर्ण संबंध टिकवा. एकमेकांशी आपुलकीने वागा. आपल्याला संविधानाने दिलेल्या अधिकारात राहून कर्तव्याप्रति नेहमी जागृत राहा. १ मे या दिवसाला महाराष्ट्रदिनासोबतच कामगार दिन म्हणून विशेष महत्त्व आहे. तेव्हा प्रत्येक कामगारांनी स्वतःच्या अधिकारांची जाणीव करून घ्या. कोविडपासून लांब राहण्याकरिता शासनाने पुरविलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करा, असे सांगितले.
न. के. वाळके, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर तथा सचिव विधी सेवा प्राधिकरण यांनीसुद्धा कोरोना संसर्गजन्य आजारापासून दूर राहण्याकरिता विशेष प्रबोधन केले. ज्यात त्यांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. मास्क अत्यावश्यक असून, शक्यतो गर्दी न करण्याचे व कामाव्यतिरिक्त घराबाहेर न पडण्याचे मौलिक मार्गदर्शन कामगार बंधूंना केले.
यावेळी कामगारांना नगर परिषदेच्या सौजन्याने व आरोग्य विभागाच्या पुढाकारातून लसीकरणसुद्धा करण्यात आले. पात्र लसीकरणधारकांना अन्नधान्याची कीट, मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
चौकट/डब्बा
सामाजिक सेवेशी एकनिष्ठता बाळगत जिल्हा विधी प्राधिकरणाच्या माध्यमातून महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत कामगार वर्गांना कोविड संसर्गजन्य आजारापासून काळजी घेण्याचे मार्गदर्शन निश्चितच कामगार, शेतकरी, व्यापारी यांना प्रेरणादायी ठरले. बीटीबी येथे कार्यक्रमाच्या आयोजनाने कामगार वर्गाचे मनोबल उंचावले. कामगारांचेसुद्धा कुणीतरी हितचिंतक आहेत, याची जाणीव कामगार दिनानिमित्ताने का होईना कामगार बंधूंना झालेली आहे, हे विशेष!
कामगार दिनानिमित्त जिल्हा विधी प्राधिकरणाच्या पुढाकारातून कामगार वर्गाला मिळालेले मार्गदर्शन निश्चितच प्रेरणादायी ठरले. बीटीबी येथील सर्व पदाधिकाऱ्यांना त्याचा सार्थ अभिमान आहे. आपण केलेले मौलिक मार्गदर्शन व सहकार्य आमच्याकरिता ऊर्जास्थान ठरले.
बंडू बारापात्रे, अध्यक्ष, बीटीबी सब्जी मंडी, भंडारा.