महसूल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 01:00 AM2019-07-12T01:00:54+5:302019-07-12T01:02:41+5:30

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या आवाहनानुसार तहसील कार्यालय लाखनी येथे कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांनी १० जुलै रोजी सामूहिक रजा, ११ आणि १२ जुलैला लेखनीबंद आणि १५ जुलै पासून बेमुदत संपात सहभागी होत असल्यामुळे महसूल विभागाचे कामकाज ठप्प पडले आहे.

Worker jam protested by revenue workers agitation | महसूल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने कामकाज ठप्प

महसूल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने कामकाज ठप्प

googlenewsNext
ठळक मुद्देलाखनी तालुका कचेरीत शुकशुकाट : अनेकांना कामाविनाच परतावे लागले

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या आवाहनानुसार तहसील कार्यालय लाखनी येथे कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांनी १० जुलै रोजी सामूहिक रजा, ११ आणि १२ जुलैला लेखनीबंद आणि १५ जुलै पासून बेमुदत संपात सहभागी होत असल्यामुळे महसूल विभागाचे कामकाज ठप्प पडले आहे.
कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची जनतेला माहिती नसल्यामुळे कामानिमित्त तहसील कार्यालयात आलेल्यांना आल्यापावली गावाकडे परत जावे लागले. या आंदोलनाने जनतेची गैरसोय होणार असल्याने लवकारात लवकर तोडगा काढणे गरजेचे झाले आहे.
दहावी व बारावीचे निकाल लागलेले असल्यामुुळे पुढील इयत्तेमध्ये प्रवेश घेण्यासाठी जात प्रमाणतपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, शिष्यवृत्तीकरिता हलफनामा या महत्वाच्या दस्ताऐवजांची आवश्यकता आहे. लाखनी तालुक्यात ७१ ग्रामपंचायती आणि एक नगर पंचायत असून १०४ गावे समाविष्ट आहेत. त्यात १० रिठी आणि ९४ लोकवस्तीची असून लोकसंख्या एक लाख २८ हजार ७७६ एवढी आहे.
महसूल विभागाचे कामकाज योग्य पध्दतीने व्हावे, याकरिता पाच मंडळ अधिकारी कार्यालये व ३९ तलाठी साझे आहेत. यातून जनतेच्या महसूल विषयक समस्या मार्गी लावल्या जातात. या कार्यालयाचे अधीकार क्षेत्रात नसलेली कामे याच कार्यालयाच्या कागदपत्राच्या पुराव्यावरुन तहसील कार्यालयातून केली जातात. पण महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेद्वारा दहा जुलैपासून आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात आला.
या आंदोलनाची जनतेला माहिती नसल्यामुळे तालुक्याचे ग्रामीण भागातून अनेक जण कामानिमित्त तहसील कार्यालयात आले. पण कार्यालयात कर्मचारी अनुपस्थित होते. तथा प्रत्येक विभागाचे दर्शनी भागावर आंदोलनाच्या दिनांकाची सुचना करुन गैरसोयीबाबत जनतेस दिलगीरी व्यक्त करण्यात आली होती.
नागपूर विद्यापिठाद्वारे पदवी परीक्षाचे निकाल घोषीत होणार असल्यामुळे पुढील वर्गात प्रवेश घेण्यासाठी हे आंदोलन दिर्घकाळ चालल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. शासनाने महसूल कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करुन तोडगा काढावा व जनतेची गैरसोय थांबवावी, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

Web Title: Worker jam protested by revenue workers agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.