कार्यकर्ता तळागाळात पोहोचणे गरजेचे

By admin | Published: May 26, 2016 01:35 AM2016-05-26T01:35:40+5:302016-05-26T01:35:40+5:30

शेतकरी, शेतमजुर व सर्वसाधारण लोकांची दिशाभूल करुन सत्ता हस्तगत करणाऱ्या भाजप पक्षाचे पितळ उघडे पडले.

Worker needs to reach the base | कार्यकर्ता तळागाळात पोहोचणे गरजेचे

कार्यकर्ता तळागाळात पोहोचणे गरजेचे

Next

तितिरमारे यांचे प्रतिपादन : तुमसरात कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
तुमसर : शेतकरी, शेतमजुर व सर्वसाधारण लोकांची दिशाभूल करुन सत्ता हस्तगत करणाऱ्या भाजप पक्षाचे पितळ उघडे पडले. परिणामी काँग्रेसकरिता परत एकदा पोषक वातावरण तयार झाले आहे. त्याला कॅश करण्याची गरज आहे. त्याकरिता काँग्रेस कार्यकर्त्यांने तळागळातील सामान्य माणसापर्यंत पोहचणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सचिव प्रमोद तितिरमारे यांनी केले. तुमसर शहर काँगे्रसचे सर्व सेलच्या नगर परिषद निवडणुकीच्या नियोजन सभेत ते बोलत होते.
यावेळी मंचावर मनोहर सिंगनजुडे, जयप्रकाश भवसागर, महिला कांग्रेसच्या सीमा भुरे, नलिनी डींकवार, लक्ष्मी काहालकर, सविता ठाकूर, कुसुम कांबळे, अशोक बन्सोड, नारायण तितिरमारे हे उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. मधुकर लंजे, हुक्कू सोनी, रतन मोहतुरे, मनोज गौरे, पंकज लवगे, आनंद मेश्राम, मनोहर नागदेवे, अनसर लाडसे, सकीत गजभिये, अजय चोपकर, योगेश गभणे, रोहीत चौधरी, दिनेश ठाकरे, शुभम भेलावे, दीपक बोरकर, स्वप्नील चन्ने, पडोळे, प्रज्वल मेश्राम, जितेश सानेकर, भूपेंद्र बडवाईक, बकाराम बनकर, पप्पु नागरिकर, अंकुश पटले, योगेश पटले, मंगेश राहांगडाले, जितेंद्र बिसने, अनमोल पटले, अमित पटले, विलास पडोळे, अतुल नागरिकर या कार्यकर्त्यांनी सोनियाजीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुमसर शहर काँग्रेस अध्यक्ष प्रा. अमर रगडे यांनी कथन केले तर संचालन राजेश बाळा ठाकूर यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुरेश मेश्राम यांनी मानले.
कार्यक्रमाकरिता सुनील पारधी, दिनेश भवसागर, आनंद बिसने, निरज गौर, प्रकाश शहारे, विलास जोशी, दिलीप चोपकर, सुरेंद्र पाटील, विजय गिरपुंजे, जयंत गणेश, मिलिंद गजभिये, गौरव नवरखेले, मोरु वहीले, कैलास नागदेवे, सुभाष गोखले, वामन तिडके, गोल्डी तितिरमारे व अन्य कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Worker needs to reach the base

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.