साकाेली येथे कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:30 AM2021-01-17T04:30:27+5:302021-01-17T04:30:27+5:30
बाेधिसत्व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समितीद्वारे साकोली येथे आयाेजित कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अ. ...
बाेधिसत्व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समितीद्वारे साकोली येथे आयाेजित कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अ. शि. रंगारी होते. याप्रसंगी महेंद्र बारसागडे यांनी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर आपला कुणी शास्ताच उरला नाही ही भावना समाजात निर्माण झाली. पण, त्यावेळेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्या परीने धम्माची चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न केला; पण राजकारण व समाजकारण याच्या फेऱ्यात धम्मचळवळ मागे पडली, असे प्रतिपादन केले. बबन चहांदे यांनी विहाराचे पावित्र्य व विहाराचे अर्थकारण यावर आपले विचार व्यक्त केले, तर प्राणहंस मेश्राम यांनी श्रामणेर झाल्यामुळे व्यक्तींच्या जीवनात काय प्रभाव पडताे याबद्दल विचार व्यक्त केले. अ. शि. रंगारी यांनी पाली भाषेचा अर्थ कळणे हे किती गरजेचे आहे हे आपल्या आयुष्यातील उदाहरणावरून समजावून सांगितले. याप्रसंगी लाखांदूर तालुक्यातील प्रीती मेश्राम व यशाेधरा बाेरकर या मुलींनी पाली भाषेचे फायदे व महत्त्व समजावून सांगितले. अशाेक रंगारी यांनी सूत्रसंचालन केले, तर ॲड. प्रभाकर बडाेले यांनी आभार मानले.