कार्यकर्त्यांनो, कामाला लागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 10:03 PM2018-03-18T22:03:40+5:302018-03-18T22:03:40+5:30
भंडारा-गोंदिया लोकसभेची पोटनिवडणूक जबरदस्तीने लादून शासनाच्या व जनतेच्या पैशाचा अपव्यय होणार आहे. जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी कुठल्याही संकटाला न घाबरता कंबर कसून भारतीय जनता पक्षाला विजयी करण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तारिक कुरेशी यांनी केले.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभेची पोटनिवडणूक जबरदस्तीने लादून शासनाच्या व जनतेच्या पैशाचा अपव्यय होणार आहे. जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी कुठल्याही संकटाला न घाबरता कंबर कसून भारतीय जनता पक्षाला विजयी करण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तारिक कुरेशी यांनी केले.
लोकसभा पोटनिवडणूकीच्या पार्श्वभुमीवर भारतीय जनता पार्टी भंडारा जिल्हा कार्यसमितीची विस्तारित बैठक मंगलम सभागृह येथे घेण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते.
बैठकीला विदर्भ विभाग संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. प्रकाश मालगावे, माजी खासदार शिशुपाल पटले, डॉ. युवराज जमईवार, आ. चरण वाघमारे, आ. बाळा काशिवार, आ. अॅड. रामचंद्र अवसरे, लोकसभा प्रभारी बाळा आंजनकर, महामंत्री प्रशांत खोब्रागडे, ज्येष्ठ नेते धनंजय मोहकर, दादा टिचकुले, रामकुमार गजभिये, तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, भंडाराचे नगराध्यक्ष सुनिल मेंढे, धनवंता राऊत, निलीमा हुमने, मो. आबीद सिध्दीकी, निशिकांत इलमे, गिता कापगते, नेपाल रंगारी, मंगेश वंजारी, मतीन शेख शिवराम गिºहेपुंजे आदी उपस्थित होते.
यावेळी भाजपा विदर्भप्रांत संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, आ. बाळा काशिवार,आ.अॅड. रामचंद्र अवसरे, डॉ. उल्हास फडके आदींनी मार्गदर्शन केले. आगामी लोकसभा पोटनिवडणूक तयारी करिता जिल्ह्यात संमेलनाच्या आयोजनाची घोषणा यावेळी करण्यात आली असून सदर संमेलन शनिवार दि. २४ मार्च रोजी जनप्रतिनिधी संमेलन अखिल सभागृह भंडारा येथे होणार आहे.
२९ मार्चला लाखनी येथे महिला मोर्चा संमेलन व ३१ मार्चला साकोली येथे अनुसूचित जाती मोर्चा संमेलन, दि. १ एप्रिल रोजी तुमसर येथे युवा मोर्चा संमेलन होणार आहे. मंडळ बैठकांचा कार्यक्रम सुध्दा जाहिर करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. युवराज जमईवार यांनी तर आभार प्रशांत खोब्रागडे यांनी मानले.