कर्मचाऱ्यांनी केला काळ्या फिती लावून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 11:59 PM2017-12-06T23:59:39+5:302017-12-06T23:59:59+5:30
राज्यात वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी करणाऱ्या विक्रीकर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनेक प्रश्नांना समोरे जावे लागत आहे.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : राज्यात वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी करणाऱ्या विक्रीकर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनेक प्रश्नांना समोरे जावे लागत आहे.
त्याच्या निषेधार्थ वस्तू व सेवाकर खात्यातील अधिकारी संघटना, कर्मचारी संघटना व गट ड कर्मचारी संघटनाच्या समन्वय समितीच्या माध्यमातून सर्वदूर महाराष्ट्रातील ४ ते ८ डिसेंबर असे पाच दिवस काळ्या फिती लावून काम करण्याचे ठरविले आहे, असे अधिकारी संघटनेच्या सहायक राज्यकर आयुक्त अश्विनी बिजवे व महाराष्ट्र विक्रीकर कर्मचारी संघटना मुंबई नागपूर विभागाचे सदस्य राजेश राऊत यांनी माहिती दिली.
वस्तु व सेवा कर विभागाच्या प्रलंबित प्रश्नाकडे प्रशासनाच्या निर्देशानुसार योग्यरितीने कामेसुद्धा पुर्ण केली. परंतु या सर्व कार्यवाहीमध्ये गट ड कर्मचाºयांपासून ते वरिष्ठ अधिकारी पदापर्यंतच्या सर्वांना सेवाशर्ती आणि प्रश्नांकडे शासन प्रशासनाने पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे. शासन उद्दीष्टपुर्ती करण्याकरिता आवश्यक गट ड संवर्गासह सर्व संवर्गातील रिक्त पदे तात्काळ भरा, राज्यकर विभागातील खाजगीकरण व कंत्राटीकरण रद्द करावे, वस्तू व सेवा कर विभागात केंद्राच्या धरतीवर समान काम, समान पद व समान वेतन ही त्रिसुत्री लागू करा, विभागातील वेतनत्रुटीचे प्रश्न सत्वर मार्गी लावा. राज्यकर सहआयुक्त व राज्यकर उपआयुक्त वर्गातील कुंठीतता दूर करा, अधिकाऱ्यांच्या कामाचे वाटप समान व योग्य प्रमाणात करण्यात यावे, विभागाच्या पुर्नरचनेत व सेवा नियमातील बदलात संघटनांना विश्वासात घेणे, अधिकारी कर्मचारी सेवाशर्ती टिकविण्याकरिता योग्य धोरणांचा अवलंब करा, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वस्तू व सेवाकर भवन उभारून भवनामध्ये अद्यावत आसन व्यवस्थेसह, संगणकासह सर्व साधन सामुग्री पुरवावी, विभागीय संवर्ग वाटप अधिनियमामधून राज्यकर विभागास कायमस्वरूपी सूट द्यावी, अधिकारी व कर्मचाºयांवरील ताणतणाव कमी करावा व सन्मानजनक वागणूक मिळावी आदी या विषयक सर्वच बाबींवर शासन प्रशासनाने जाणीवपूर्वक कानाडोळा केला आहे, अशी माहिती अधिकारी संघटनेच्या सहायक राज्यकर आयुक्त अश्विनी बिजवे यांनी दिली.