कामगार नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 12:41 AM2018-12-09T00:41:15+5:302018-12-09T00:41:40+5:30
सिहोरा परिसरातील गावात कामगार नोंदणी प्रक्रियेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. केंद्रावर वाढती गर्दी असल्याने अनेक कामगार नोंदणीपासून वंचित झाले असल्याने पुन्हा नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरातील गावात कामगार नोंदणी प्रक्रियेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. केंद्रावर वाढती गर्दी असल्याने अनेक कामगार नोंदणीपासून वंचित झाले असल्याने पुन्हा नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. जुन्या केंद्रावरच ही प्रक्रिया राबविली जाणार आहे.
राज्य शासनाच्या अटल विश्वकर्मा कामगार नोंदणी अभियानाला सिहोरा परिसरात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कामगारांचे नोंदणी केंद्रावर कामगारांची प्रचंड गर्दी होत असल्याने अनेक कामगारांना नोंदणी विना घरी परतावे लागले आहे. अनेक केंद्रावर हजारोंच्या उपस्थितीने कामगारांची हजेरी लावली आहे. प्रत्यक्षात या केंद्रावर कामगारांची नोंदणी करताना ५०० ते ८०० पर्यंत नोंदणीची मजल मारण्यात आली आहे.
कामगारांचे अर्जासोबत आवश्यक दस्तऐवजांची तपासणी करण्यात येत असल्याने नोंदणी कार्यात विलंब लागत आहे. कामगारांना न्याय आणि हक्क देताना या उपक्रमावर आमदार चरण वाघमारे यांनी हक्क देताना या उपक्रमावर आमदार चरण वाघमारे यांनी विशेष लक्ष घातले आहे. प्रत्येक कामगारांना न्याय देताना नोंदणी पासून वंचित असल्याने चिंता वाढल्या आहेत. वंचित कामगारांचे न्यायासाठी मागणीनुसार जुन्या केंद्रावर पुन्हा नोंदणी अभियान सुरु करण्यात येणार आहे.
कामगार नोंदणी प्रक्रियेत कामगारांचे वतीने प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक जिल्हा परिषद क्षेत्रात प्रथम टप्प्यात कामगार नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.
कामगारांची वाढती संख्या लक्षात घेता न्यायासाठी पुन्हा नोंदणी अभियानाला सुरुवात करण्याची मागणी होत आहे.
येरली गावात कामगार नोंदणी अभियानात तीन हजार कामगारांची हजेरी लावली असताना पूर्ण कामगारांची नोंदणी करण्यात आली नाही. यामुळे वंचित कामगारांचे न्यायासाठी सिहोरा परिसरात पुन्हा ही प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. येरली गावात कामगारांना सोयी, सुविधा उपलब्ध करण्यासाठी सरपंच रविता रमेश पारधी, उपसरपंच मुरली भगत, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बंडू बनकर, नंदू राहांगडाले तथा ग्रामपंचायत सदस्य व युवा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केली आहे.
उद्या श्रीराम चषक
मोहगाव (खदान) येथे उद्या ९ डिसेंबर ला श्रीराम चषक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जलयुक्त शिवार फुटबॉल स्पर्धा घेण्यात येत आहे. या कार्यक्रमात हजेरी लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कामगार नोंदणी प्रक्रियेतून अनेक जण वंचित झाली आहे. आ. चरण वाघमारे यांना माहिती देण्यात आली असून पुन्हा नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
- बंडू बनकर,
जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा डोंगरला.