कार्यकर्त्यांनी पक्षासाठी काम करावे
By admin | Published: September 9, 2015 12:33 AM2015-09-09T00:33:27+5:302015-09-09T00:33:27+5:30
पक्षाने काय दिले हा विचार न करता सर्व कार्यकर्त्यांनी पक्षासाठी काम करावे. पक्षामध्ये भेदभाव ठेवू नये. जाती धर्माचे बंधने तोडून एक दिलाने पक्षासाठी काम करावे, ...
कार्यकर्ता मेळावा : चित्रा वाघ यांचे प्रतिपादन
भंडारा : पक्षाने काय दिले हा विचार न करता सर्व कार्यकर्त्यांनी पक्षासाठी काम करावे. पक्षामध्ये भेदभाव ठेवू नये. जाती धर्माचे बंधने तोडून एक दिलाने पक्षासाठी काम करावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी व्यक्त केला.
भंडारा येथे राष्ट्रवादी काँगे्रस तथा महिला सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, प्रदेश सचिव धनंजय दलाल, महिला जिल्हाध्यक्ष नलिनी कोरडे, कृषी सभापती नरेश डहारे, महिला व बाल विकास सभापती शुभांगी रहांगडाले, युवती अध्यक्ष कल्याणी भुरे, सच्चिदानंद फुलेकर यांनी उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना वाघ यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना सोबत घेवून चालण्याची क्षमता दाखवून दिली आहे. जिल्ह्याला प्रफुल पटेलांसारखे कुशल नेतृत्व मिळाले असून त्यांच्यामुळे जिल्ह्याचा विकास होत आहे. कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी मेहनत घ्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सभेला उपस्थित मान्यवरांची समायोचित भाषणे झालीत. सभेला नगरपरिषद उपाध्यक्षा कविता भोंगाडे, जिल्हा परिषद सदस्य पार्वता डोंगरे, मनोरथा जांभुळे, ज्योती खवास, संगीता सोनवाने, गीता माटे, माधुरी देशकर, अर्मिला आगासे, नगरसेविका विद्या फुलेकर, रत्नमाला साठवणे यांच्यासह शेकडो महिला कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होत्या. संचालन ज्योती टेंभुर्णे तर प्रास्ताविक कल्याणी भुरे यांनी केले.
कार्यक्रमासाठी उत्तम कळपाते, नंदू झंझाड, स्वप्नील नशिने, राजू हेडावू, पंकज ठवकर, अक्षय पवार, नितीन तुमाने, सुभाष वाघमारे, हितेश सेलोकर आदींनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)