साखर कारखान्यातील सहा जणांचे निलंबन मागे घेण्यासाठी कामगार संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:35 AM2021-04-18T04:35:18+5:302021-04-18T04:35:18+5:30
थकीत पगार, ग्रॅज्युएटी, पीएफ, समान कामास समान वेतन, पगाराची निश्चित तारीख. रिक्त जागेवर त्याच विभागातील कामगारास प्राधान्य द्यावे आदी ...
थकीत पगार, ग्रॅज्युएटी, पीएफ, समान कामास समान वेतन, पगाराची निश्चित तारीख. रिक्त जागेवर त्याच विभागातील कामगारास प्राधान्य द्यावे आदी मागण्यांसाठी वेळोवेळी कामगारांकडून निवेदन देण्यात आले. परंतु प्रत्येक वेळी दुर्लक्ष झाल्याने कामगारांनी काम बंद आंदोलन सुरु केले. देव्हाडा मानस युनिट नंबर ४ येथील कामगारानी न्याय मागण्यांच्या पूर्ततेसाठी कारखान्याचे कार्यकारी संचालक व सहायक कामगार, आयुक्त भंडारा यांना २७ ऑक्टोंबर २०२०, ६ डिसेंबर २०२०, २९ डिसेंबर २०२० च्या पत्रानुसार वेळोवेळी कळविले. परंतु जवळपास सहा महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही कामगारांच्या मागण्याकडे कारखाना व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष केले. वारंवार खोटे आश्वासन देऊन कामगाराची दिशाभूल केली गेली. गळीत हंगाम २०२० ते २०२१ पार पाडला आहे. त्यानंतर २८ डिसेंबर २०२० रोजी कामगारांची समस्या न सोडवल्यास .कामगार केव्हाही काम बंद करू शकतात, असा इशाराही दिला होता. जेव्हा सहायक कामगार आयुक्त, भंडारा येथे मागण्यांविषयी तारखा दिल्या तेव्हा मानस युनिट नंबर ४ चे जबाबदार अधिकारी कोणीही यावेळी आले नव्हते. ही कामगारासाठी शोकांतिका ठरली होती. कामगांरांनी होळी सणासंबंधी पगार ओव्हरटाईम पगाराची मागणी केली. तेव्हाही व्यवस्थापनाने कानाडोळा करून वेळ मारून नेल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. त्यांनतर ०४ एप्रिल २०२१ पर्यत बंद असल्यामुळे कामगांरानी पगार करण्यासाठी व्यवस्थापनाला खूप मोठा वेळ मिळाला. परंतु कामगाराविषयी योग्य ती काळजी घेण्यात आली नाही. त्यामुळे कामगारानी तोडगा निघत नसल्यामुळे नाईलाजास्तव आपल्या हक्कासाठी गेट बंद करण्याचा इशारा दिला होता. कामगारांनी सामूहिकरीत्या आंदोलनात भाग घेतला. परंतु सहा कामगारांवरच निलंबनाची कार्यवाही का? सामूहिक निलंबन पत्र का? देण्यात आलं नाही? चौकशीच करायची असेल तर संपूर्ण कामगारांची करावी. सर्व संबंधितांना निलंबन पत्र द्यावे. अथवा सर्व कामगांराना कामावरून काढावे. जो पर्यत सहा कामगारांचे निलंबन रद्द होणार नाही, तोपर्यंत कुठलाही कामगार कामावर जाणार नाही. काही अनुचित प्रकार घडल्यास व्यवस्थापन अधिकारी सर्वस्वी जबाबदार राहतील, असा इशारा कामगारांनी कार्यकारी संचालक, मानस अँग्रो इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. देव्हाडा बु. यांना तसेच सहायक कामगार अधिकारी तुमसर, सहायक कामगार आयुक्त लेबर कोर्ट भंडारा, तहसीलदार मोहाडी, ठाणेदार पोलीस स्टेशन करडी यांना पत्राद्वारे कळविले आहे.
बॉक्स
कामगारांच्या या आहेत प्रमुख मागण्या
प्रत्येक महिन्याची पगाराची तारीख जाहीर करावी, ग्रॅच्युइटी बेसिक पगारावर न देता पूर्ण पगारावर नियमानुसार कामागारांना देण्यात यावी, ई. पी. एफ. ची रक्कम बेसिक पगारावर कपात न करता मिळणारे पूर्ण पगाराचे रकमेवर १०% कपात करणे, समान पदानुसार पगाराची तफावत दूर करून समान पदानुसार समान वेतन देण्यात यावे, रिक्त झालेल्या जागेवर त्याच विभागातील कामगाराला प्राधान्य देऊन, पगारवाढ करुन ग्रेडेशन करावे, सर्व कामागारांचे ग्रेडेशन करुन तफावत दूर करावी, जानेवारी २०२१ चा पगार व माहे डिंसेबर २०२० चा ओव्हरटाईमचा पगार जमा केला. मात्र ११० कामगांराना सोडून काही ठराविक ६ कामगारांना त्यांच्या घरी जाऊन निलंबन पत्र दिले आहे. व्यवस्थापनाने कामगार कामावर हजर असताना निलंबनाचे पत्र द्यायला पाहिजे होते. परंतु तसे न करता कामगाराचे कुटुंबीयांजवळ पत्र देऊन स्वाक्षरी घेतली. कोरोना काळात कामगाराचे कुटुंबावर दडपण आणून भयभीत केले जात आहे, असा आरोप कामगारांकडून करण्यात आला आहे.
कोट
कामगारांना नियमित पगार दिला जात आहे. कामगारांच्या आंदोलनास हरकत नाही. गाड्या अडवून कारखान्याचे नुकसान करणे योग्य नाही. कामगारांच्या पगार व अन्य मागण्यांसाठी वेळोवेळी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. पीएफचा पैसा वेळेत जमा करणे ही कारखान्याची जबाबदारी आहे. परंतू सहा कामगारांनी इतर कामगारांना भडकावून अधिकाऱ्यांना धमकाविल्याने व नुकसान झाल्याने त्यांचेवर चौकशी पर्यंत निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे. यावर व्यवस्थापन मंडळच निर्णय घेणार आहे.
- विजय राऊत, उपमहाव्यवस्थापक मानस अँग्रो कारखाना देव्हाडा बुज