महाराष्ट्र पशुविज्ञान परिषदेची कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:35 AM2021-07-31T04:35:52+5:302021-07-31T04:35:52+5:30
कार्यशाळेत एमएएफएसयू येथील प्रा. डॉ. मुकुंद कदम व डॉ. सतीश जाधव यांनी अनुक्रमे पोल्ट्री व्यवस्थापन व मार्केटिंग आणि प्रोटोझून ...
कार्यशाळेत एमएएफएसयू येथील प्रा. डॉ. मुकुंद कदम व डॉ. सतीश जाधव यांनी अनुक्रमे पोल्ट्री व्यवस्थापन व मार्केटिंग आणि प्रोटोझून रोग याबाबत मार्गदर्शन केले. पशुवैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ. अजय पोहरकर, डॉ. सोनकुसरे, डॉ. खोडसकर, डॉ. भडके, डॉ. डांगोरे, डॉ.वराडकर यांना आयोजक तसेच अतिथी यांनी पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन सन्मानित केले.
या कार्यशाळेसोबतच नियत वयोमानाने सेवानिवृत्त होत असल्याने अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किशोर कुंभरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी एमएलडीबी उपायुक्त डॉ. गोरे, डॉ. फुके व सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. नितीन ठाकरे उपस्थित होते. नागपूर विभागातील जास्तीत जास्त कृत्रिम रेतन करणाऱ्या अधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. संचालन सहाय्यक आयुक्त डॉ. निनाद कोरडे यांनी केले. आभार सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. अतुल डांगोरे यांनी मानले.