घरकुलाच्या प्रतीक्षेत उघड्यावर पडला संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:38 AM2021-09-18T04:38:19+5:302021-09-18T04:38:19+5:30

वरठी : घरकूल योजने अंतर्गत बेघराना घर देण्याची शासनाची योजना आहे. जिल्ह्यात घरकूल योजनेचे कामे धडाक्यात सुरू आहेत. ...

The world fell open while waiting for Gharkula | घरकुलाच्या प्रतीक्षेत उघड्यावर पडला संसार

घरकुलाच्या प्रतीक्षेत उघड्यावर पडला संसार

googlenewsNext

वरठी : घरकूल योजने अंतर्गत बेघराना घर देण्याची शासनाची योजना आहे. जिल्ह्यात घरकूल योजनेचे कामे धडाक्यात सुरू आहेत. मात्र अजूनही खरे लाभार्थी योजनेपासून वंचित असल्याचे निदर्शनास येत आहे. मोहाडी तालुक्यातील नेरी येथील भागरता पालांदुरकर यापैकी एक आहेत. घरकुलाच्या प्रतीक्षेत त्यांचे संसार उघड्यावर पडले आहे. नेरी येथे जवळपास २० कुटुंबीयांना घरकूल योजनेची तत्काळ आवश्यकता आहे.

भागरता पालांदुरकर या अनेक वर्षांपासून नेरी येथे वडिलोपार्जित घरी राहतात. घरात अठराविश्व दारिद्य्र असल्याने खायचे वांदे आहेत. अल्पभूधारक असल्याने कमाईचे स्रोत नाही. कमाईचे ठोस स्रोत नसल्याने अनेक अनेक दिवसांपासून घरकूलच्या प्रतीक्षेत आहेत. घराच्या प्रतीक्षेत त्यांच्या पतीचे निधन झाले. भागरता बाईचे वय ६५ च्या जवळपास आहे. त्या आपल्या मुलासोबत पडक्या घरात राहतात. सध्या त्या निराधार योजनेच्या मानधनावर आपला गाडा हाकत आहेत. मुलगा मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतो. त्यांच्या घराला मातीच्या भिंती आहेत. घराच्या भिंती जीर्ण झाल्याने त्या घरात राहणे धोकादायक आहे. पर्याय नसल्याने ते जीव धोक्यात घालून मुलाच्या परिवारासह राहतात. घराची अवस्था वाईट असल्याने पावसाळ्यात घराशेजारील नालीतील सांडपाणी घरात शिरते.

घरकूल योजनेचा लाभ मिळावा म्हणून त्यांनी अनेकदा ग्रामपंचायतमार्फत अर्ज केले. मोहाडी पंचायत समितीला अनेकदा पत्रव्यवहार करून घरकूल योजनेत प्राधान्य देण्याची विनंती केली. पण अद्याप त्यांना घरकूल मंजूर न झाल्याने त्यांच्यावर नामुष्की ओढवली आहे. त्याचा अर्धअधिक संसार रस्त्यावर सुरू आहे. पावसाळ्यात घरात पाणी शिरत असल्याने त्यांना कमालीचा त्रास भोगावा लागत आहे. गरजूंना विशेष प्राधान्य देण्याची शासनाची योजना असताना घरकूल न मिळाल्याने आश्चर्य आहे. भागरता पालांदूरकर यांना विशेष योजनेतून घरकूल देण्याची मागणी सर्वस्तवरून होत आहे.

बॉक्स

घरकूल मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू

भागरता पालांदूरकर यांचे नाव घरकूलच्या ड यादीत आहे. ड यादी अजूनही शासनाने मंजूर केलेली नाही. त्यामुळे घरकूलचे प्रस्ताव रखडले आहे. ग्रामपंचायत स्तरावर सर्व आवश्यक कारवाई करण्यात आली. घरकूल मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती सरपंच आनंद मलेवार यांनी दिली. शासनाने गरजूना प्राधान्याने घरकूल देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: The world fell open while waiting for Gharkula

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.