विविध ठिकाणी जागतिक योग दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:23 AM2021-06-23T04:23:26+5:302021-06-23T04:23:26+5:30
भंडारा : प्रचंड तणाव आणि मानसिक दडपणामुळे आज मानवी शरीर आजाराचे घर बनले आहे. मानसिक सुदृढता यावी आणि आणि ...
भंडारा : प्रचंड तणाव आणि मानसिक दडपणामुळे आज मानवी शरीर आजाराचे घर बनले आहे. मानसिक सुदृढता यावी आणि आणि आरोग्यासाठी योगाला जीवनाचा अविभाज्य अंग बनविणे काळाची गरज झाली आहे. स्वतःसाठी जरासा वेळ काढून योगाचा "योग" नियमित साधला जावा. कोरोना काळात हाच योगा सकारात्मक ऊर्जा देण्यासाठी खंबीर आधार ठरला आहे. त्यामुळे योग आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक मानून जीवनशैली आखा, असा मोलाचा सल्ला खा. सुनील मेंढे यांनी मंगळवारी दिला. बहिरंगेश्वर मंदिर खाम तलाव, मिस्कीन्ट टॅंक गार्डन, स्प्रिंग डेल स्कूल भंडारा अशा विविध ठिकाणी जागतिक योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांना त्यांनी भेटी दिल्या. यावेळी त्यांनी स्वतः योगा करून सुदृढ आरोग्याचा संदेश नागरिकांना दिला.
यावेळी त्यांच्या सोबत डॉ. उल्हास फडके, चैतन्य उमाळकर, माजी नगराध्यक्ष शहारे गुरुजी, मंजिरी पनवेलकर, नगरसेविका मधुरा मदनकर, साधना त्रिवेदी, माला बागमारे, कैलास तांडेकर, बंटी मिश्रा, मंगेश वंजारी, मनोज बोरकर, पप्पू भोपे, रोशनी पडोळे, कैलास कुरंजेकर, प्रशांत निंबोळकर, अमित बिसने, संजय चौधरी, भूपेश तलमले, रोशन काटेखाये, किशोर ठाकरे, चेतन चटुले, शुभम चौधरी, सुदीप शहारे, राजेश करंडे, डॉ. विजय आयलवार, योगा प्रशिक्षक मंजूषा डवले, नीलिमा मारवाडे, आदी उपस्थित होते.