उपासक हा शीलवान असावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 01:40 AM2018-02-19T01:40:40+5:302018-02-19T01:41:08+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक बौद्ध उपासक व्यक्तीला बौद्ध बनविण्याचा अधिकार दिला, परंतु तो शीलवान असला पाहिजे तेव्हाच तो दुसºया व्यक्तीला बौद्ध बनवू शकतो, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे विदर्भ प्रदेशचे उपाध्यक्ष मनोहर दुपारे .....

The worshiper should be the best | उपासक हा शीलवान असावा

उपासक हा शीलवान असावा

Next
ठळक मुद्देमनोहर दुपारे : शिंगोरी-चांदोरी येथे बौद्धधम्म मेळावा

ऑनलाईन लोकमत
भंडारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक बौद्ध उपासक व्यक्तीला बौद्ध बनविण्याचा अधिकार दिला, परंतु तो शीलवान असला पाहिजे तेव्हाच तो दुसऱ्या व्यक्तीला बौद्ध बनवू शकतो, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे विदर्भ प्रदेशचे उपाध्यक्ष मनोहर दुपारे नागपूर यांनी शिंगोरी (चांदोरी) येथील आयोजित बौद्धधम्म मेळाव्यात व्यक्त केले.
पूज्य भदन्त सत्रत्न महाथेरो यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित २३ व्या धम्म मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून अनिलकुमार मेश्राम, भिक्खुणी सुमेधा आर्याजी, भिक्खुणी विशाखा आर्याजी, भदन्त गयाकाश्यप हे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष एम. यू. मेश्राम होते. यावेळी अमृत बन्सोड, डी. एफ. कोचे, हर्षल मेश्राम, प्रिया शहारे, प्रा. वासंतिका सरदार उपस्थित होते. अनिलकुमार मेश्राम म्हणाले, प्रत्येकानी मी बौध्द असल्याचे त्यांच्या वर्तुणुकीवरुन दाखविले पाहिजे.
भिक्खुणी सुमेधा यांनी म्हटले की प्रत्येकामध्ये शील व मैत्रिभावना असली पाहिजे. कुठलेही अहंकार असता कामा नये. गयाकश्यप भन्ते यांनी म्हटले की, समाजात समता व बंधुभाव रुजला पाहिजे, तर अध्यक्ष एम. यू. मेश्राम म्हणाले, बौद्ध महासभा, समता सैनिक दल, रिपब्लिकन पक्ष एकत्र येऊन काम केल्यास धम्माची प्रगती होऊ शकते. प्रास्ताविक संस्थेचे सचिव एम. डब्ल्यू. दहिवले यांनी तर संचालन प्रा. रमेश जांगळे यांनी केले. संस्था उपाध्यक्ष आय. जी. बन्सोड यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला वामनराव रंगारी, बाबुराव नागदेवे, पी. के. ठवरे, नागसेन देशभ्रतार, सुनिल चौधरी, लोकमित्र सरदार, मंगेश हुमने, ज्ञानेश्वर गजभिये, हरिश्चंद्र धारगावे, रवि ढोके, श्रीराम बोरकर, राजकिरण रामटेके, आहुजा डोंगरे, दिपक मेश्राम, आर. एम. मेश्राम, प्रमोद बोरकर, रविकिरण मोटघरे, पुरुषोत्तम शहारे, मनोहर हजारे, जगन्नाथ गणवीर, निशांत शामकुवर, प्रभाकर सुखदेवे, पुरुषोत्तम बागडे, प्रविण मेश्राम, युवराज कोचे, धनराज वरखडे, मोहित उके, सिमरन सुर्यवंशी, चंद्रकलाबाई मेश्राम, लिनता देशभ्रतार, रंजना रंगारी, कल्पना ढोके, स्वर्णलता दहिवले, रमा मेश्राम, शकुंतला गजभिये, माधुरी मेश्राम, लता ठवरे, वंदना लोणारे, अर्चना रंगारी, सुनंदा अंबादे, तेजस्वी रंगारी, करिश्मा अंबादे, अरुणा बन्सोड, शोभा कांबळे, सिंधुताई बोरकर, कविता देशभ्रतार, साधना बोरकर, अल्का डोंगरे, तृप्ती मेश्राम, नुरी मोटघरे, बौध्द उपासक-उपासिका उपस्थित होते.

Web Title: The worshiper should be the best

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.