पालोरा येथे कुस्त्यांची आमदंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 09:46 PM2017-10-22T21:46:21+5:302017-10-22T21:46:36+5:30

तरुणांनी खेड्यांचा मैदानी खेळ कुस्त्यांकडे वळले पाहिजे. गावातील आखाडे पुन्हा नव्या दमाने सुसज्ज केले पाहिजे. कुस्त्यांमुळे अनेकदा रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या आहेत.

The wreckage amadangal at Palora | पालोरा येथे कुस्त्यांची आमदंगल

पालोरा येथे कुस्त्यांची आमदंगल

googlenewsNext
ठळक मुद्देके.के. पंचबुद्धे : तरुणांनी कुस्त्यांकडे वळावे

लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : तरुणांनी खेड्यांचा मैदानी खेळ कुस्त्यांकडे वळले पाहिजे. गावातील आखाडे पुन्हा नव्या दमाने सुसज्ज केले पाहिजे. कुस्त्यांमुळे अनेकदा रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या आहेत. देशाची व समाजाची सेवा करण्याचे सौभाग्य लाभले आहे. बलदंड व निरोगी शरीर तयार करणाºया खेळाची जोपासना झाली पाहिजे, असे प्रतिपादन जि.प. सदस्य के.के. पंचबुद्धे यांनी केले.
पालोरा येथे आयोजित कुस्त्यांचे आमदंगल उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त सैनिक कैलाश बुरडे हे होते. मैदान पूजकस्थानी गटसचिव विनोद तिजारे होते. भाजपा तालुकाध्यक्ष बाबूजी ठवकर, पालोराचे नवनिर्वाचित सरपंच महादेव बुरडे, नवनिर्वाचित सदस्य भोजराम तिजारे, विजय हाडगे, आमदंगलीचे मुख्य आयोजक मनोहर रोटके, श्रीराम रेहपाडे, पुरुषोत्तम बावनकर, मनोहर वहिले, बोधानंद रोडगे, क्रिष्णा कुकडे, चंद्रभान तिजारे, पोलीस पाटील विरेंद्र रंगारी, दौलत तिजारे उपस्थित होते.
यावेळी महादेव बुरडे म्हणाले, गावातील बंद पडलेल्या आखाड्यासाठी शक्य तेवढी मदत केली जाईल. मात्र मदतीनंतर आखाडा चालविण्याची जबाबदारी ग्रामस्थांनी घ्यावी तरच हे शक्य असल्याचे सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते हनुमंतांच्या प्रतिमेचे पूजन करून मैदानाचे फित कापून उद्घाटन झाले. कुस्त्यांना मोहाडी, तुमसर व भंडारा येथील नागरिकांनी हजेरी लावली होती. पारंपारिक कुस्त्यांची दंगल बघायला मिळणार असल्याने सर्वांना उत्सुकता लागली आहे.

Web Title: The wreckage amadangal at Palora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.