कुस्ती स्पर्धा रंगल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 05:31 PM2018-08-25T17:31:52+5:302018-08-25T17:31:57+5:30

शहरातील कै. भाऊलाल पहिलवान लोणारी क्र ीडा संकुलात झालेल्या तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत शहर व तालुक्यातील विविध माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग दिसून आला. फ्रीस्टाइल व ग्रिको रोमनमधील विविध वजनी गटात खेळविल्या गेलेल्या या कुस्ती स्पर्धेत मुलांनी अनेक डावांचे दर्शन घडवले. मुलीदेखील या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.

Wrestling competition | कुस्ती स्पर्धा रंगल्या

कुस्ती स्पर्धा रंगल्या

Next

येवला : शहरातील कै. भाऊलाल पहिलवान लोणारी क्र ीडा संकुलात झालेल्या तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत शहर व तालुक्यातील विविध माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग दिसून आला. फ्रीस्टाइल व ग्रिको रोमनमधील विविध वजनी गटात खेळविल्या गेलेल्या या कुस्ती स्पर्धेत मुलांनी अनेक डावांचे दर्शन घडवले. मुलीदेखील या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. मुलांच्या संघांनी प्रेक्षणीय कुस्त्या करत वाहवा मिळविली. १४, १७ तसेच १९ वर्ष वयोगटातील अनेक वजनी वजन गटात खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन पालिका मुख्य अधिकारी संगीता नांदूरकर, पंचायत समितीचे माजी सभापती संभाजीराजे पवार, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी, सुंदरबाई लोणारी, बाजार समितीचे माजी सभापती अरु ण काळे, उपमहाराष्ट्र केसरी पैलवान राजेंद्र लोणारी, नगरसेवक दयानंद जावळे, कला व वाणिज्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. शिरीष नांदुर्डीकर, माजी नगरसेवक तथा क्र ीडाशिक्षक सागर लोणारी, भगीरथ गायकवाड, गंगाधर लोणारी, स्पर्धेचे तालुका संयोजक तथा क्र ीडाशिक्षक नवनाथ उंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धेचे पंच म्हणून पैलवान राजेंद्र लोणारी, विजय लोणारी, रोहन लोणारी, क्र ीडाशिक्षक सागर लोणारी,रोहन परदेशी, निखिल सांबर, मंगेश शेलार, लक्ष्मण गवळी, मन्ना वाडेकर, प्रवीण लोणारी आदींनी काम पाहिले. क्र ीडाशिक्षक सोनवणे, सानप, अरु ण गायकवाड, विजय क्षीरसागर, परदेशी, विजय आहिरराव, ठोंबरे, सचिन पगारे, मुटेकर, आर. ए. गायकवाड, सचिन अहिरे, बोरणारे, गाजरे, कुणाल भावसार, सचिन चांगळे, कुºहाडे आदींची यावेळी उपस्थिती होती.

Web Title: Wrestling competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.