यंदा श्रावण २९ दिवसांचा; मंदिरात प्रवेश मिळणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:25 AM2021-07-18T04:25:33+5:302021-07-18T04:25:33+5:30
भंडारा : गत दीड वर्षापासून कोरोना संसर्गामुळे अनेकदा जिल्ह्यातील मंदिरे बंद ठेवण्यात आली होती.मात्र आता कोरोना संसर्ग कमी झाला ...
भंडारा : गत दीड वर्षापासून कोरोना संसर्गामुळे अनेकदा जिल्ह्यातील मंदिरे बंद ठेवण्यात आली होती.मात्र आता कोरोना संसर्ग कमी झाला असल्याने भक्तांना श्रावण महिन्यात मंदिरात जायला मिळणार काय? याकडे लक्ष लागून आहे.
श्रावण महिन्यात विविध शिवमंदिरात भक्तांची गर्दी होते. गतवर्षी कोरोना संसर्गामुळे मंदिरांचे दरवाजे उघडण्यात आले नव्हते. आता कोरोना संसर्ग काहीसा कमी झाला आहे. जिल्ह्यातील मंदिरांची दारे आता श्रावण महिन्यात उघडे राहणार काय? असा प्रश्न आहे. हिंदू धर्मातील पवित्र असा श्रावण महिन्यात विविध सणवार उत्सवांची मालिकाच सुरु होते. ९ ऑगस्टपासून श्रावणमासाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सरकारने श्रावण महिन्यात कुठेही मंदिरे बंद ठेवू नयेत अशी अपेक्षा भक्तमंडळी तसेच विविध ट्रस्टकडन होत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी शिवमंदिर आहेत. श्रावण महिन्यात यात्रा भरत असते. यालाही परवानगी देण्याची मागणी आहे.
९ ऑगस्टपासून श्रावण
हिंदू धर्मात श्रावण महिन्याला महत्व आहे. या महिन्यात नागपंचमीपासून ते गणपती, श्रीकृष्ण जन्माष्टमी अशा विविध सणांना सुरुवात होते. या काळात शेतीची कामे आटोपल्याने बळीराजापासून ते सर्वच वर्गातील भक्तमंडळी आपल्या वेळेनुसार देवदर्शनासाठी जातात. गत दोन वर्षापासून अनेकांना शिवमंदिरात जाता आलेले नाही.
व्यवसायिक म्हणतात...
माझ्या वाडवडिलांपासून आमचे पूजा साहित्य विक्रीवरच घर चालते. आमच्याकडे शेती नाही.त्यामुळे धार्मिक पूजा साहित्यातूनच आम्हाला रोजगार मिळतो. हिंदू परंपरेनुसार सर्वाधिक श्रावण महिन्यात देवदर्शनाला महत्व आहे. गेल्यावर्षी कोरोना लाटेमुळे अनेकांना मंदिरात जाता आले नव्हते.
-राहुल पांडे, दुकानदार
श्रावण महिन्यात बेलाची पाने, विविध प्रकारची पांढरी फुले अशी निसर्गाकडूनही उधळण होते. त्यामुळे सहजासहजी उपलब्ध होणाऱ्या या फुलातूनही आम्हाला चार पैेसे मिळतात. यासोबतच महादेव मंदिरात जाणारे भक्त बेल व इतर पूजेचे साहित्य खरेदी करतात.यातूनच पैसे मिळतात.
-अमित बनकर, दुकानदार