होय, माणुसकी अजूनही जिवंत आहे, १३ हजार केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 05:00 AM2020-06-24T05:00:00+5:302020-06-24T05:01:01+5:30

सोमवारी सकाळी पृथ्वीराज मेश्राम गावाबाहेर फिरायला गेले होते. रस्त्याच्या कडेला एक पॉकिट दिसले. पॉकिटात नोटा होत्या. परंतु पॉकीट नेमके कुणाचा याचा काहीही उल्लेख नव्हता. शोधाशोध करूनही थांगपत्ता लागत नव्हता. अखेर सोशल मीडियातून संबंधित पॉकीटधारकाचा शोध सुरु झाला. दुसºया दिवशी सदर पॉकीट गावातीलच थालीराम बावणे यांचे असल्याचे पुढे आले. गावातील प्रतिष्ठीत व्यक्तीच्या समक्ष १३ हजार २०० रुपये असलेले पॉकीट परत करण्यात आले.

Yes, humanity is still alive, 13,000 have returned | होय, माणुसकी अजूनही जिवंत आहे, १३ हजार केले परत

होय, माणुसकी अजूनही जिवंत आहे, १३ हजार केले परत

Next
ठळक मुद्देखराशीत प्रामाणिकतेचा प्रत्यय : लॉकडाऊनच्या आर्थिक आपत्तीत चांगला संदेश

मुखरु बागडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : लॉकडाऊनमुळे आर्थिक आपत्तीच्या संकटात सापडलेल्या स्थितीतही माणसामधील माणुसकी जीवंत आहे. याचा प्रत्यय लाखनी तालुक्यातील खराशी येथे आला. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका व्यक्तीला रस्त्याच्या कडेला पॉकीट दिसले. उघडून पाहिले तर त्यात नोटाच नोटा होत्या. पॉकिट कुणाचे असेल असा विचार करीत शोधाशोध सुरु झाली. सोशल मीडियाचा आधार घेण्यात आला. अखेर दुसऱ्या दिवशी पॉकिट मालकाचा शोध लागला आणि ते त्याच गावातील सुतारकाम करणाऱ्या व्यक्तीचे होते. पृथ्वीराज मेश्राम यांनी सापडलेले १३ हजार २०० रुपये त्याला परत केले.
सोमवारी सकाळी पृथ्वीराज मेश्राम गावाबाहेर फिरायला गेले होते. रस्त्याच्या कडेला एक पॉकिट दिसले. पॉकिटात नोटा होत्या. परंतु पॉकीट नेमके कुणाचा याचा काहीही उल्लेख नव्हता. शोधाशोध करूनही थांगपत्ता लागत नव्हता. अखेर सोशल मीडियातून संबंधित पॉकीटधारकाचा शोध सुरु झाला. दुसºया दिवशी सदर पॉकीट गावातीलच थालीराम बावणे यांचे असल्याचे पुढे आले. गावातील प्रतिष्ठीत व्यक्तीच्या समक्ष १३ हजार २०० रुपये असलेले पॉकीट परत करण्यात आले. यावेळी तंटामुक्त समिती अध्यक्ष मनोहर झळके, माजी उपसरपंच योगेश झळके, टिकेश्वर मेश्राम, तुळशीदास कठाणे उपस्थित होते.
सुतारकाम करणाºया थालीराम बावणे आपले पॉकीट हरविल्याने विवंचनेतच होते. मात्र पॉकीट आपल्या घरी पैशासह आणून दिल्यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. आजही माणुसकी जीवंत आहे याचा प्रत्यय पृथ्वीराजच्या प्रामाणिकतेतून दिसून आला. कोरोना संकटाच्या काळात माणूस आपली माणूसकी अद्यापही विसरला नाही. सापडलेले पैसे परत करुन पृथ्वीराज मेश्राम यानी त्याचा प्रत्यय दिला. खरे तर लॉकडाऊनमुळे प्रत्येकजण आर्थिक अडचणीत सापडले आहे. पंरतु माणुसकी जीवंत असली की कितीही संकटे आली तरी माणुस आपल्यातील प्रामाणिकपणा सोडत नाही याचा प्रत्यय आला. तर आपले हरविलेले पॉकीट परत मिळणार यावर थलीराम बावने यांचा विश्वासही बसत नव्हता.

गावकऱ्यांनी केले प्रामाणिकतेचे कौतुक
पृथ्वीराज मेश्राम यांची प्रामाणिकपणे पैसे परत केल्याची वार्ता गावभर पसरली. सर्वत्र कौतूक होऊ लागले. शिक्षक डमदेव कहालकर यांना ही माहिती मिळताच त्यांनी पृथ्वीराजचे घर गाठले. त्याच्या प्रामाणिकतेचे कौतुक करीत घरी छोटेखानी सत्कार केला.

Web Title: Yes, humanity is still alive, 13,000 have returned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.