अवैधरित्या भरणाºया बैल बाजारावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 12:16 AM2017-09-07T00:16:23+5:302017-09-07T00:16:34+5:30
तालुक्यातील गायमुख जवळील रामपूर येथे अवैधरित्या बैल बाजार मागील अनेक महिन्यांपासून सुरु आहे. येथे नियमानुसार कारवाई कधीही झाली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तालुक्यातील गायमुख जवळील रामपूर येथे अवैधरित्या बैल बाजार मागील अनेक महिन्यांपासून सुरु आहे. येथे नियमानुसार कारवाई कधीही झाली नाही. बुधवारी पोलिसांनी आकस्मिक धाड घातली. यावेळी तिथे दुधाळू म्हशी आढळल्या. दुपारपर्यंत येथे बैल बाजार सुरु होता. पोलीस येणार असल्याची माहिती मिळताच दलालांनी बाजारातून पळ काढला. अवैधरित्या भरणाºया बैल बाजार संदर्भात पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
गायमुख जवळील रामपूर येथे अनेक महिन्यापासून अवैध बैल बाजार अधिकाºयांच्या आदेशानुसार सुरु आहे. स्थानिक ग्रामपंचायतीची येथे परवानगी नसल्याची माहिती आहे. मध्यप्रदेशातून येथे मोठ्या प्रमाणात बैल विक्रीकरिता येतात. कामठी, नागपूर तथा हैद्राबाद येथे या बैलांची रवानगी कत्तलखान्याकडे केली जाते अशी माहिती आहे. बुधवारी येथे बैल बाजार भरतो. बुधवारी दुपारी येथे बैल बाजार सुरु झाला, परंतु पोलीस येणार असल्याची माहिती दलालांना मिळताच त्यांनी बैल बाजारातून बाजार बंद करून काढता पाय काढला. दलालांना कुणी माहिती दिली हा संशोधनाचा विषय आहे.
आंधळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण गुरनुले व त्यांच्यासोबत पाच पोलीस कर्मचाºयांनी बाजारावर धाड मारली. तेव्हा बाजारात केवळ दुधाळू म्हशी आढळल्या. पोलीस येण्यापूर्वीच येथे बैलांचा बाजार तात्काळ बंद करण्यात आला अशी माहिती आहे. लाखोंची बैल बाजारात उलाढाल होते. मागील अनेक महिन्यापासून भंडारा व नागपूर सीमेवर हा बैल बाजार भरीत आहे.
बुधवारी दुपारी पाच पोलिसांसोबत स्वत: पेट्रोलिंग करिता राजापूर येथे गेले असता बैल बाजार भरला नव्हता. दुधाळू म्हशी आढळल्या. गुप्त माहितीच्या आधारे बाजारावर कारवाई करीताच आम्ही गेलो होते. नियमानुसार नक्कीच कारवाई करण्यात येईल.
- अरुण गुरनुले,
पोलीस निरीक्षक, आंधळगाव.