अष्टांगा योगाशिवाय योग साध्य नाही
By admin | Published: June 19, 2016 12:18 AM2016-06-19T00:18:12+5:302016-06-19T00:18:12+5:30
जागतिक योग दिनानिमित्त आयोजित प्राणायाम व योग शिबिराचे उद्घाटन मिस्किन टँक येथे पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष वामन गोंधुळे हे होते.
वामन गोंधुळे यांचे प्रतिपादन : मिस्किन टँक येथे योग शिबिर
भंडारा : जागतिक योग दिनानिमित्त आयोजित प्राणायाम व योग शिबिराचे उद्घाटन मिस्किन टँक येथे पार पडले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष वामन गोंधुळे हे होते. तर महादेव बांगळकर, मंगला कोल्हे, सुशीला भलगट, डॉ. यशवंत गायधनी, मो. सईद शेख, बबन खेडकर, राधाकिसन झंवर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन भारतमातेच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आले. आयुष्य मंत्रालयतर्फे दिलेल्या निर्देशित प्रोटोकॉलनुसार प्रमुख योग शिक्षक श्याम कुकडे यांनी पाठ्यक्रमांक नुसार उपस्थित योग साधकांकडून योग व प्राणायामाचे प्रशिक्षण दिले.
कार्यक्रम अध्यक्ष गोंधुळे यांनी योगाचे महत्व विशद करताना अष्टांगा योगाशिवाय योग साध्य होऊ शकत नाहीत असे प्रतिपादन केले.
प्रमुख अतिथी डॉ. यशवंत गायधनी यांनी शारीरिक, मानसिक, बौध्दीक, आत्मिक आदीचा विकास करायचा असेल तर योगाशिवाय तरणोपाय नाही असे म्हटले. मो. सईद शेख यांनी शरीरस्वास्थ्यासोबतच सर्व मानवजातीला जोडण्याचे काम ही योगाद्वारे होत आहे. असे प्रतिपादन केले. योगाबद्दल राधाकिसन झंवर, मंगला कोल्हे, महादेवराव बांगळकर यांनीसुध्दा योगाचे महत्व सांगितले.
संचालन प्रमुख योग शिक्षक श्याम कुकडे यांनी केले. तर आभार प्रभाकर तितिरमारे यांनी मानले. शिबिरात बहुसंख्येने योग साधकांची आवर्जून उपस्थिती होती. शिबिर कार्यक्रमाअंती अल्पोहाराचा सर्वांनी आस्वाद घेतला.
हे शिबिर २१ जूनपर्यंत चालणार असून याचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)