तुमसरात प्रवासी घामाघूम्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 01:06 AM2019-05-03T01:06:14+5:302019-05-03T01:06:44+5:30

मुंबई-हावडा प्रमुख रेल्वेमार्गावर तुमसर रोड जंक्शन रेल्वे स्थानकात फुटवे ब्रीजकरीता भर उन्हाळ्यात रेल्वेस्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक दोन व तीन वरील शेड काढण्यात आले. त्यामुळे जागतिक उच्चांक गाठणाऱ्या भीषण उष्णतेत रेल्वे प्रवाशांना रेल्वे गाडीची प्रतिक्षा करावी लागत आहे.

You all the traveler Ghamaghoom | तुमसरात प्रवासी घामाघूम्

तुमसरात प्रवासी घामाघूम्

Next
ठळक मुद्देरेल्वे स्थानकातील प्रकार : नियोजनचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : मुंबई-हावडा प्रमुख रेल्वेमार्गावर तुमसर रोड जंक्शन रेल्वे स्थानकात फुटवे ब्रीजकरीता भर उन्हाळ्यात रेल्वेस्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक दोन व तीन वरील शेड काढण्यात आले. त्यामुळे जागतिक उच्चांक गाठणाऱ्या भीषण उष्णतेत रेल्वे प्रवाशांना रेल्वे गाडीची प्रतिक्षा करावी लागत आहे. जागतिक दर्जाच्या प्रवाशांना सेवा सुविधा पुरविण्यात रेल्वेचा दावा येथे फोल ठरत आहे.
तुमसर रोड रेल्वे स्थानकात प्लटफॉर्म क्रमांक दोन व तीन हे मुख्य प्लटफॉर्म आहे. सदर प्लटफॉर्म क्रमांक शेजारीतून फुटवे ब्रीजचे बांधकाम सुरू आहे. त्यांना अडथळा होत असल्याने दोन्ही प्लॅटफॉर्म क्रमांकावरील शेड काढण्यात आले. सुमारे ५० मीटर लांब शेड येथे नुकतेच काढण्यात आले आहे. या दोन्ही प्लटफॉर्मवर एक्सप्रेस व लोकल प्रवाशी गाड्यांचा थांबा आहे. सध्या पूर्व विदर्भातील भंडारा-गोंदिया जिल्ह्यात सुर्य आग ओकत आहे. ४६ अंश सेल्सीयस तापमान वाढले आहे. उष्णतेचा जागतिक उच्चांक येथे गाठले गेले आहे. अशा भीषण उष्णतेत सुर्याच्या प्रकोप शेकडो रेल्वे प्रवाशांना रेल्वे गाडीची प्रतिक्षा करावी लागत आहे. पुन्हा तापमानात वाढ होण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.
रेल्वेत नियोजनाचा अभावाचा फटका शेकडो रेल्वे प्रवाशांना दररोज बसत आहे. लहान मुले, वृद्ध, स्त्री, पुरूषांना येथे कमालीचा उन्हाचा त्रास होत आहे. तुमसर रोड रेल्वे स्थानकातून दररोज हजारो प्रवाशी येथे ये-जा करतात. रेल्वेला लाखोंचे महसूल या रेल्वे स्थानकातून प्राप्त होते. मेल, एक्सप्रेस तथा पॅसेंजर गाड्यांचा येथे थांबा आहे. केवळ ८१ किमीवर रेल्वेचे विभागीय व्यवस्थापकांचे मुख्यालय आहे. दररोज रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी या मार्गावरून ये-जा करतात. अधिकाऱ्यांचे या समस्येकडे अक्षम्य दुर्लक्ष दिसत आहे.

तुमसर रोड रेल्वे स्थानकातील प्रवाशी शेड काढण्यात आले असून भीषण उष्णतेत प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. रेल्वेच्या नियोजनाचा येथे अभाव दिसत आहे. सदर प्रकरणाची चौकशी करण्याकरिता थेट रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत.
-प्रा. संजय बुराडे, देवानंद वासनिक नियमित रेल्वे प्रवाशी, तुमसर.

शेड आता का काढले?
सध्या भीषण उन्हाळा आहे. सुट्यामध्ये प्रवाशांची मोठी गर्दी आहे. रेल्वेला भारताची लाईफ लाइन असे म्हणतात. रेल्वेचे ब्रीद आहे. उन्हाळ्यानंतर पावसाळ्यात अथवा हिवाळ्यात शेड काढण्याची गरज होती. मागील एका वर्षापासून फुटवे ब्रीजचे काम येथे रखडले आहे. या समस्येवर स्थानिक रेल्वे अधिकारी बोलायला तयार नाही. वरिष्ठांचे आदेश असल्याचे सांगून मोकळे होत आहेत. येथे जबाबदारी तत्वाची पायमल्ली सुरू आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे मुख्यालय नागपूर आहे. नागपूर मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाºयांना भीषण उन्हाळ्याची निश्चितच माहिती आहे.
रेल्वे स्थानकातील पंखे कुचकामी
तुमसर रोड रेल्वे स्थानकात प्रवाशांकरीता सिलिंग पंखे लावले आहेत, परंतु जिथे प्रवाशी बसण्याची सोय रेल्वेने केली तिथे पंखे लावले नसून भलतीचकडे लावले आहेत. त्यामुळे प्रवाशांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक रेल्वेस्थानकात अनेक तांत्रिक कर्मचारी व संबंधित विभागाचे अधिकारी आहेत. त्यांचे येथे दुर्लक्ष दिसत असल्याचा आरोप रेल्वे प्रवाशांनी लावला आहे.
फोटोसहित रेल्वे मंत्र्यांना टिष्ट्वट
रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचेकडे रेल्वे प्रवाशांनी तुमसर रोड रेल्वेस्थानकातील प्रवाशी शेड काढल्याची तक्रार टिष्ट्वटरवर करण्यात आली आहे. मागील १५ दिवसांपासून त्यावर कोणतीच दखल घेण्यात आली नाही. याकडे रेल्वे मंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

Web Title: You all the traveler Ghamaghoom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे