तुमसरात बँक ग्राहक असुरक्षित

By admin | Published: August 2, 2015 12:52 AM2015-08-02T00:52:59+5:302015-08-02T00:52:59+5:30

शहरात १२ राष्ट्रीयकृत बँका असून २२ ते २५ पतसंस्था आहेत. सीसीटीव्ही कॅमेरा विशेषत:

You bank all the customers unsafe | तुमसरात बँक ग्राहक असुरक्षित

तुमसरात बँक ग्राहक असुरक्षित

Next

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अस्पष्ट चित्र : लाखोंची उलाढाल असूनही बँक अधिकारी गाफील
तुमसर : शहरात १२ राष्ट्रीयकृत बँका असून २२ ते २५ पतसंस्था आहेत. सीसीटीव्ही कॅमेरा विशेषत: बँकाच्या प्रवेशद्वारासमोरील कॅमेरा अचूक चित्र घेण्यास असमर्थ ठरत आहे. यामळे शहरातील हजारो बँक खातेदार असुरक्षित असल्याचे दिसून येते.
तुमसर शहरात मागील काही महिण्यात बँक तथा परिसरातून ग्राहकांची रक्कम चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना घडल्या आहेत. परंतु त्यांचा सुगावा लागला नाही. काही खातेदारांनी पोलिसात तक्रार दाखल केली नाही. गुरुवारी दुपारी २ वाजता भारतीय स्टेट बँकेसमोर राजेश उपरीकर या खातेदाराची रक्कम त्याच्या सतर्कतेमुळे थोडक्यात बचावली. येथील सीसीटीव्ही कॅमेरातून रस्त्यावरील फुटेज बघीतल्यावर पोलिसांना ते अंधूक दिसून आले. आरोपींचे चेहरे फूटेजमध्ये दिसत नाही. त्यामूळे आरोपींचा शोध लावणे पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
शहरात १२ राष्ट्रीयकृत बँका मुख्य मार्गावर आहेत. २२ ते २५ पतसंस्था आहेत. दररोज या बँकात लाखोंची उलाढाल होते. बँक प्रशासनाने खातेदारांच्या सुरक्षितेकरिता उपाययोजना केली, परंतु ती तोकडी आहे. बँकेच्या आतील सीसीटीव्ही फूटेज स्पष्ट दिसतात. परंतू बाहेर प्रवेशद्वारावर लावलेल्या कॅमेऱ्यात मात्र चित्र स्पष्ट दिसत नाहीत.
रस्त्यावरील धूळीचे कण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात जात असल्याने त्याच्या चित्र घेण्यात अडथळा निर्माण होत असल्याचे जाणवते. सर्वच बँक प्रशासनाने एच.डी. सीसीटीव्ही कॅमेरे नव्याने लावण्याची गरज आहे. काही बँकेत साधे सीसीटीव्ही कॅमेरे लावले अशी माहिती आहे. हे कॅमेरे सध्या कालबाह्य झाले आहेत.
शहरातील एका बँकेत सीसीटीव्ही कॅमेरे तर आहेत. परंतु त्यांची रेकॉर्डींगची व्यवस्थाच नसल्याची धक्कादायक माहिती आहे. यासंदर्भात पोलीस निरीक्षक किशोर गवई चौकशी करणार असल्याचे समजते.
तुमसर शहरात बँकेबाहेर सराईत टोळी बँक ग्राहकांना सावज समजून टिपण्याचा प्रयत्न करीत आहे. ही टोळी शहरातील आहे की, बाहेरची याची कसून चौकशी सुरु आहे. बँकेने येथे आपल्या खातेदारांनी सौजन्य दाखवून दिलेल्या निर्देशांचे पालन करण्याची गरज आहे.
शहरात यामुळे महिला खातेदारात कमालीची भीती निर्माण झाली आहे. सध्या सर्व व्यवहार बँकेतून करणे सुरु झाले आहेत, हे विशेष. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: You bank all the customers unsafe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.