तुमसरात फेसयुक्त व काळसर पाण्याचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 10:50 PM2018-05-09T22:50:15+5:302018-05-09T22:50:38+5:30
नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रथम कार्य आहे. तुमसर शहरातील इंदिरा नगरात मागील तीन दिवसापासून नळाला फेसयुक्त व काळसर पाणीपुरवठा केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रथम कार्य आहे. तुमसर शहरातील इंदिरा नगरात मागील तीन दिवसापासून नळाला फेसयुक्त व काळसर पाणीपुरवठा केला जात आहे. नगरपरिषद प्रशासनाचे येथे दुर्लक्ष दिसत आहे. कावीळ तथा जलजन्य आजाराच्या भीतीेने नागरिकात भीती व्याप्त आहे.
शहरातील इंदिरा नगरात मागील तीन दिवसापासून नळाला फेसयुक्त तथा काळसर पाणीपुरवठा केला जात आहे. बादलीत पाणी घेतल्यावर साबणाचा फेसासारखा पदार्थ पाण्यात तरंगतांना दिसतो. पाण्याचा रंग काळाकुट्ट आहे. दूषित पाणी कसे प्यावे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या पाण्याने आंघोळ कशी करावी. घरगुती वापराकरिताही दूषित पाणी कसा उपयोगात आणावा असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला.
सहा महिन्यापूर्वी इंदिरा नगरात गढूळ (दूषित) पाणीपुरवठा केल्याने अनेक नागरिकांना कावीळ आजाराची लागण झाली होती. त्याची पुनरावृत्ती येथे होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली. इंदिरा नगरातील अनेक नागरिक सध्या आरोचे पाणी विकत घेत आहेत. जलवाहिनी लिकेज असल्यामुळे नालीतील पाणी जलवाहिनीत जात असल्याचा आरोप इंदिरा नगरातील रहिवासी हरिश धार्मीक यांनी केला आहे.
इंदिरा नगरातील दूषित पाणी पुरवठा करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार करण्यात आली आहे. स्थानिक नगरपरिषद प्रशासनाचा कुणीही संबंधित विभागाचा कर्मचारी फिरकला नाही. नगरपरिषद प्रशासनाचे येथे दुर्लक्ष दिसत आहे. पाण्यासारखी गंभीर विषयाकडे नगर परिषद प्रशासन तथा पदाधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे. ही समस्या मार्गी न लागल्यास स्थानिक नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
इंदिरानगरात दूषित पाणी पुरवठ्याबाबत मला माहिती नाही. याबाबत पाणीपुरवठा विभागाला निर्देश देऊन समस्या तात्काळ सोडवायला सांगेन. नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याकरिता आम्ही कटीबद्ध आहोत.
- अर्चना मेंढे, मुख्याधिकारी, न.प. तुमसर.
मागील तीन दिवसापासून इंदिरानगरात दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. जलवाहिनी लिकेजमुळे नालीतील लपाणी जलवाहिनीत शिरकाव करीत असावा. या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
- हरिष धार्मिक, रहिवासी, इंदिरा नगर, तुमसर.