तुमसरात यापुढे चालणार नाही बुलडोजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:27 AM2017-07-20T00:27:49+5:302017-07-20T00:27:49+5:30

न.प. तुमसरने भर पावसाळ्यात अतिक्रमण मोहीम राबवून फुटपाथ, दुकानदारावर बुलडोजर चालविल्याने व्यापाऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला.

You do not have anymore bulldozers | तुमसरात यापुढे चालणार नाही बुलडोजर

तुमसरात यापुढे चालणार नाही बुलडोजर

Next

मुख्याधिकाऱ्यांची ग्वाही : दुकाने लावण्यासही दिली मुकसंमती
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : न.प. तुमसरने भर पावसाळ्यात अतिक्रमण मोहीम राबवून फुटपाथ, दुकानदारावर बुलडोजर चालविल्याने व्यापाऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. दरम्यान फुटपाथ व्यापाऱ्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. उपोषणाचा तंबू ठोकताच न.प. प ्रशासनाने नमते घेत त्या व्यापाऱ्यांना त्याच ठिकाणी दुकाने लावण्याची मुकसंमती दिली व यापुढे तुमसर शहरात कधीही बुलडोजर चालणार नाही अशी ग्वाही दिली व उपोषणकर्त्यांना लिंबूपाणी पाजून उपोषण सोडविण्यात आले.
दि.२९ व ३० जून रोजी न.प. प्रशासनाद्वारे अतिक्रमण मोहीम भर पावसाळ्यात राबविण्यात आली. अतिक्रमण निर्मूलन करताना बाजार परिसरातील रस्ते मोकळे करणे हा एकमेव उद्देश असल्याचे व्यापाऱ्यासोबत झालेल्या सभेत न.प. प्रशासनाने सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात फुटपाथ व्यापाऱ्यांच्या दुकानदारावरच बुलडोजर चालवून मोहीम पाडली. त्यामुळे न.प. प्रशासन एकाला मायेची व एकाला मावशीची साप्तीक वागणूक देत असल्याचा आरोप झाला. दरम्यान बेरोजगार झालेल्या व्यापाऱ्यांनी न.प. प्रशासनाला दुकान लावण्याबाबत विचारणा केली असता नकारात्मक उत्तर मिळाले. त्यामुळे फुटपाथ व्यापाऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला. फुटपाथ व्यापारीचे स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्याच ठिकाणी दुकाने होती. आता ती दुकाने हटविल्याने न.प. ने जागा उपलब्ध करून द्यावी ही मागणी करत आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज दि. १९ जुलै रोजी फुटपाथ व्यापाऱ्यांनी न.प. समोर उपोषणाचा तंबू ठोकताच नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी सर्व नगरसेवकांची तातडीची बैठक बोलाविली होती. तर उपोषणकर्त्यांनी माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांच्या नेतृत्वात न.प. वर हल्ला केला असता विद्यमान नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी लोकहितार्थ निर्णय घेऊन बेरोजगार झालेल्या व्यापाऱ्यांना त्याच ठिकाणी विशिष्ट मोजमापाची जागा अलॉट करून दुकाने लावण्याची परवानगी दिली व त्या परवानगीला मुख्य अधिकारी अर्चना मेंढे यांनीही मुक संमती दर्शवून यापुढे तुमसरात कधीही बुलडोजर चालणार नाही अशी ग्वाही सभागृहात दिली.
यावेळी उपाध्यक्षा कांचन कोडवानी, नगरसेवक रजनिश लांजेवार, मेहताबसिंग ठाकुर, शाम धुर्वे, विरोधी पक्ष नेता अमर रगडे, सलाम तुरक, प्रमोद घरडे, गीता कोंडेवार, वर्षा लांजेवार, छाया मलेवार, खुशलता गजभिये, राजेश ठाकुर शिव बोरकर, सचिन गायधने, राकेश धार्मिक, राजू गायधने, उज्ज्वल सहारे, सचिन शेंद्रे, जाकीर तुरक, निशिकांत पेठे, अंकुर ठाकुर व असंख्य उपोषणकर्ते पुरुष व महिला उपस्थित होते.

उपासमारीची वेळ
फुटपाथ दुकानदारांची बुलडोजरच्या सहाय्याने अतिक्रमण काढल्यामुळे अनेक दुकानदारांसमोर प्रपंच कसा चालवावा असा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. अतिक्रमणाच्या नावाखाली प्रशासनाची ही कारवाई पोटावर लात मारण्यासारखी आहे, अशी संतप्त प्रतिक्रियाही फुटपाथ दुकानदारांनी व्यक्त केली होती.

Web Title: You do not have anymore bulldozers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.