वाहनाच्या धडकेत तरुण ठार

By admin | Published: December 28, 2015 12:49 AM2015-12-28T00:49:28+5:302015-12-28T00:49:28+5:30

दुचाकीने रस्ता ओलांडत असताना एका विद्यार्थ्याला अज्ञात चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

The young killed in the vehicle | वाहनाच्या धडकेत तरुण ठार

वाहनाच्या धडकेत तरुण ठार

Next

साकोली येथील घटना : बी.फार्म तृतीय वर्षाचा होता विद्यार्थी
साकोली : दुचाकीने रस्ता ओलांडत असताना एका विद्यार्थ्याला अज्ञात चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर रात्री ९ वाजता घडली. सुमीत महेंद्र जणेवार (२३) रा.श्रीनगर गोंदिया हल्ली मुक्काम साकोली असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
सुमीत हा मागील तीन वर्षापासून येथील बाजीराव करंजेकर फार्मसी महाविद्यालयात बी-फार्मचे शिक्षण घेत आहे.
यावर्षी बी.फार्मचे तृतीय वर्ष असल्यामुळे तो श्रीनगर कॉलनी भाड्याने खोली घेऊन राहत होता. शनिवारला रात्री सुमीत ९ वाजता दुचाकी एम.एच.३३ /ई.६७२६ ने महामार्ग ओलांडत असताना विरुध्द दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका चारचाकी कारने वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. यात सुमितच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आज दुपारी उत्तरिय तपासणीनंतर त्याचे पार्थिव नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले. याप्रकणी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुध्द गुन्हा नोंद केला आहे. (तालुका प्रतिनिधी)

बेलाजवळ भरधाव वाहन अपघातात तिघे गंभीर जखमी
भंडारा : भंडाराहून नागपूरकडे जाणाऱ्या ओमनी गाडीला विरूध्द दिशेने येणाऱ्या भरधाव तवेरा गाडीने जबर धडक दिली. ही घटना रविवारला सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास महामार्गावरील बेलाजवळ घडली. या अपघातात ओमणीमधील तिघे गंभीररित्या जखमी झाले. रंजितसिंह, ज्ञानसिंग, अमरसिंग चितोडीया अशी जखमींची नावे आहेत. जडीबुटी विकण्याचा व्यवसाय करण्यासाठी चितोडीया कुटूंबिय बैलबाजार स्थळी मुक्कामी होते. आज रविवारला सकाळी चितोडीया कुटूंबातील पाच सदस्य ओमनी वाहन डब्ल्यू.पी.७०-ए-३१५१ ने नागपूरकडे जात होते. बेला गावाजवळ नागपूरकडून भंडाऱ्याकडे येणाऱ्या तवेरा गाडी एमएच१२/के.वाय-८२४४ ने जबर धडक दिली. या अपघातात ओमनीतील पाच जणांपैकी तिघांच्या पायांना गंभीर दुखापत झाली. दोघे किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी जखमींना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले.अपघातानंतर तवेरा गाडीचा चालक वाहन सोडून घटनास्थळावरून पसार झाला. यावेळी बराच वेळ महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी तवेरा चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास भंडारा पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The young killed in the vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.