भंडारात देशी कट्ट्यासह तरुणास केले जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 10:12 PM2019-03-27T22:12:32+5:302019-03-27T22:12:54+5:30
देशी कट्यासह छत्तीसगढ राज्यातील एका तरुणाला येथील वरठी मार्गावर पोलिसांनी नाकाबंदी करुन बुधवारी पहाटे जेरबंद केले. त्याच्याजवळून १२२ जीवंत काडतूस जप्त करण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या काळात तरुणाजवळ देशी कट्टा आढळल्याने एकच खळबळ उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : देशी कट्यासह छत्तीसगढ राज्यातील एका तरुणाला येथील वरठी मार्गावर पोलिसांनी नाकाबंदी करुन बुधवारी पहाटे जेरबंद केले. त्याच्याजवळून १२२ जीवंत काडतूस जप्त करण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या काळात तरुणाजवळ देशी कट्टा आढळल्याने एकच खळबळ उडाली.
शुभम सुब्रत नंदी (२३) रा. भिलाई हल्ली मुकाम गांधी वॉर्ड, तुमसर असे आरोपीचे नाव आहे. वरठी मार्गाने जाणा-या एका तरुणाजवळ देशी कट्टा असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू यांना मिळाली. त्यांनी दिलेल्या सुचनेवरुन भंडारा शहरचे ठाणेदार सुधाकर चव्हाण व पोलीस निरीक्षक रविंद्र चव्हाण यांनी पथकासह नाकांबद केली. बुधवारी पहाटे वरठी मार्गावर बॅरिकेट्स लावून तपासणी सुरु केली त्यावेळी २२ वर्षाचा तरुण शास्त्री चौकाकडून येताना दिसला. त्याला ताब्यात घेवून चौकशी केली. अंगझडती त्याच्या जीन्स पॅन्टमध्ये एक लाकडी मूठ असलेला काळ्या रंगाचा देशी कट्टा आढळून आला. तसेच पॅन्टच्या खिश्यात १२२ जीवंत काडतूस आढळून आले. त्याला परवाना विचारला असता त्याच्या जवळ कोणताही परवाना आढळला नाही. त्यामुळे त्यास तात्काळ ताब्यात घेवून त्याच्याविरुध्द शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करुन अटक केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख रविंद्र मानकर, उपनिरीक्षक खाडे, सहायक फौजदार रहांगडाले, हवालदार सुधीर मडामे, विनायक रहपाडे, धर्मेंद्र बोरकर, साजन वाघमारे, अजय कुकडे, चेतन कोटे, ठवकर, निर्वाण यांनी केली. निवडणूक काळात देशी कट्टा आढळल्याने खळबळ उडाली आहे.