३०० रुपयांसाठी तरुणाने घेतला मजुराचा जीव; आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2022 12:20 PM2022-03-26T12:20:46+5:302022-03-26T12:29:18+5:30

भंडारा येथील इंदिरा गांधी वॉर्डात गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. वारंवार मागूनही उसणवार दिलेले पैसे परत करत नसल्याने ही घटना घडली. भंडारा पोलिसांनी शुक्रवारी आरोपीला अटक केली.

Young man kills laborer for 300 rupees in bhandara | ३०० रुपयांसाठी तरुणाने घेतला मजुराचा जीव; आरोपी अटकेत

३०० रुपयांसाठी तरुणाने घेतला मजुराचा जीव; आरोपी अटकेत

Next
ठळक मुद्देभंडाराची घटना उसणवार पैशावरून वादलाकडी दांड्याने डोक्यावर प्रहार

भंडारा : सोबत मजुरीचे काम करणाऱ्या तरुणाने ३०० रुपयांसाठी आपल्या सहकारी मजुराचा लाकडी दांड्याने प्रहार करून खून करण्याची घटना भंडारा येथील इंदिरा गांधी वॉर्डात गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. वारंवार मागूनही उसणवार दिलेले पैसे परत करत नसल्याने ही घटना घडली. भंडारा पोलिसांनी शुक्रवारी आरोपीला अटक केली.

सतीश आनंदराव रामटेके (४८, रा. राजगुरू वॉर्ड, बजाज शाळेजवळ, भंडारा) असे मृताचे नाव आहे. तर अमन अनिल सोनेकर (२४, रा. इंदिरा गांधी वॉर्ड, चांदणी चौक, भंडारा) असे आरोपीचे नाव आहे. सतीश आणि अमन दोघेही मजुरीचे काम सोबतच करीत होते. काही दिवसांपूर्वी सतीशने अमनकडून ३०० रुपये उसणवार घेतले होते. मात्र वारंवार पैशाची मागणी करूनही तो पैसे परत करीत नव्हता.

गुरुवारी या दोघांत ३०० रुपयांवरून वाद झाला. इंदिरा गांधी वॉर्डातील कुंभारटोला परिसरात सतीशने आपल्याजवळील लाकडी दांड्याने डोक्यावर प्रहार केला. तो घाव वर्मी बसल्याने सतीश रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला जखमी अवस्थेत सोडून अमन तेथून पसार झाला. काही वेळातच सतीशचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती भंडारा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र सायंकाळी सतीशचा आकस्मिक नाही तर खून झाल्याचे पुढे आले. पोलिसांनी भादंवि ३०२, २०१ कलमान्वये गुन्हा दाखल केला. भंडाराचे ठाणेदार सुभाष बारसे यांनी तपासाचे चक्र फिरवून आरोपीचा शोध सुरू केला. अवघ्या आठ तासांत अमन सोनेकर याला अटक केली.

शहरात खळबळ

अवघ्या ३०० रुपयांसाठी आपल्याच सहकार्याचा खून केल्याची घटना घडल्याचे माहीत होताच भंडारा शहरात शुक्रवारी एकच खळबळ उडाली. गेल्या अनेक दिवसांपासून सतीश आणि अमन एकत्रच मजुरीचे काम करीत होते. मात्र ३०० रुपयांवरून वाद विकोपाला गेला आणि एका मजुराचा बळी गेला.

Web Title: Young man kills laborer for 300 rupees in bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.