कान्होबा विसर्जनासाठी स्वत:च्या आचरणातून तरूणाचा आदर्श
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 12:30 AM2019-09-01T00:30:21+5:302019-09-01T00:31:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : शहरातील मिस्किन टँक, वैनगंगा नदीघाटावर विसर्जनाच्या दिवशी अस्वच्छता असते. वारंवार प्रशासनाकडे तक्रार करूनही त्यामध्ये ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरातील मिस्किन टँक, वैनगंगा नदीघाटावर विसर्जनाच्या दिवशी अस्वच्छता असते. वारंवार प्रशासनाकडे तक्रार करूनही त्यामध्ये फारसा बदल होत नसल्याने यावर स्वत:च तोडगा काढण्यासाठी शहरातील राजगोपालाचारी वॉर्डातील रहिवासी विवेक रविंद्र मेश्राम या उच्च शिक्षित तरूणाने कान्होबा घरच्या घरी मूर्ती विसर्जन करून आदर्श निर्माण केला आहे.
नदीघाटावर विसर्जनासाठी येणाऱ्या शहरवासीयांची संख्या लक्षात घेता हार, फुले, प्रसाद, भुजली, धान्य यासर्वांमुळे कचऱ्याची मोठी समस्या निर्माण होते आणि सणाच्या उत्सवाला बाधा निर्माण होते. त्यासाठी काहीतरी केले पाहिजे, यासाठी मेश्राम यांच्यासह त्यांच्या मित्रमंडळींना हा प्रश्न सतावत होता. मात्र यासाठी काय करता येईल, त्यांनी आपल्या परिसरातील नागरिकांना कानोबा विसर्जनासाठी नदीमध्ये, तलावामध्ये मूर्ती विसर्जन न करता कृत्रिम पानवठा तयार करून त्यामध्ये विसर्जन करण्याचा आग्रह धरला.
त्याची सुरवात त्यांनी आपल्यापासून करत आपल्या मित्रांच्या साक्षिने घरच्या घरी पूजा, अर्चा झाल्यानंतर विसर्जन एका मोठ्या भांड्यामध्ये करून आदर्श तयार केला आहे. हाच आदर्श इतर नागरिकांनीही व प्रशासनाने घेण्याची गरज निर्माण झाली आहे. वाढत्या जलप्रदूषणावर आळा घालण्यासाठी नगरपरिषदेने शहरातील विविध भागात कृत्रिम पानवठे, तलावांची निर्मिती करून निर्माल्य साहित्यासाठी वॉर्डनिहाय गाड्या पाठवून कचरा गोळा करण्याची गरज आहे.
अन्नदानावर केला खर्च
सण, उत्सव हे आनंद देण्यासाठी येतात परंतु अलीकडे बदललेल्या जीवनशैलीने उत्सव साजरे करण्याच्या पद्धतीचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे.ते बदलण्यासाठी घरी जेवणासाठी मित्रमंडळी,गरजंूना अन्नदान करुन विर्सजणाची वेगळी सुरवात केल्याचे विवेक मेश्राम यांनी सांगितले.