तरुणांनो, खेळणे बनण्यापेक्षा खेळाडू बनून आयुष्य सार्थक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 06:00 AM2019-12-08T06:00:00+5:302019-12-08T06:00:30+5:30
शैक्षणिक मागासलेपणा दुर करुन जास्तीत जास्त तरुणांनी शिक्षण घेवून समाजातील मागासलेल्या लोकांकरिता काम करण्याची गरज असल्याचे त्यानी सांगितले. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय माळी महासंघ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अॅड. राजेंद्र महाडोळे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणमन रेशीम उद्योग संचालक भाग्यश्री बानायत, अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. श्रीकांत भुसारी, प्रमुख वक्ते दिलीप सोळके आदी उपस्थित होते
लोकमत न्यूज नेटवर्क
सानगडी : माळी समाजाला शैक्षणिक, आर्थिक मागासलेपणातून बाहेर काढायचे असेल तर तरुणांनी खेळण बनण्यापेक्षा खेळाडू बनून आयुष्याचे सार्थक करावे , असे प्रतिपादन सेवानिवृत्त परिवहन अधिकारी वेणुगोपाल शेंडे यांनी केले.
सानगडी येथे प्रबोधन कार्यक्रम निमित्ताने तरुणांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी शैक्षणिक मागासलेपणा दुर करुन जास्तीत जास्त तरुणांनी शिक्षण घेवून समाजातील मागासलेल्या लोकांकरिता काम करण्याची गरज असल्याचे त्यानी सांगितले. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय माळी महासंघ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अॅड. राजेंद्र महाडोळे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणमन रेशीम उद्योग संचालक भाग्यश्री बानायत, अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. श्रीकांत भुसारी, प्रमुख वक्ते दिलीप सोळके आदी उपस्थित होते
यावेळी भाग्यश्री बानायत यांनी शेतकऱ्यांनी पारंपारिक धान शेती सोडून आर्थिक प्रगतीसाठी किमान एक एकर तरी रेशीम उद्योग उभारावा, असे आवाहन केले. पारंपारिक धान शेतीपेक्षा रेशीम शेतीतून पाच पट अधिक उत्पादन मिळते याची त्यांनी उदाहरणाद्वारे खात्री दिली.
अॅड. राजेंद्र महाडोळे म्हणाले, समाजबांधवांनी समाजकारणासोबत राजकारणाकडे वळून प्रगतीची दारे ज्या संसदेतून किंवा विधानसभेतून उघडली जातात, त्याठिकाणी प्रतिनिधीत्व मिळवण्यासाठी प्रयत्न केला तरच समाजाची प्रगती अधीक वेगाने होऊ शकते, अशी आशावादी भूमिका मांडली. याप्रसंगी जनार्धन लोथे स्मृती पुरस्काराने मीनल गोटेफोडे, दिशा खर्डेकर, साक्षी गोटेफोडे, अश्विनी राऊत, भाग्यरी उके, शिवानी इरले, प्रतीक बाचलकर यांना गौरविण्यात आले.
संचालन माणिक खर्डेकर, प्रा. नाजुकराम बनकर यांनी तर, आभार प्रदर्शन विहिरगावचे सरपंच रविंद्र खंडाळकर केले. कार्यक्रमासाठी हरिभाऊ बनकर, विजय खंडाळकर, दीपक उपरीकर, मनोहर नगरकर, मनोहर गोविंदा इटवले, वासुदेव नगरकर, मनोहर ईटवले, रविशंकर लोथे, धनराज लोथे, मुनीश्वर उपरिकर, जनार्धन डोंगरवार, चंद्रहास खंडाळकर, चुन्नीलाल लोथे, नरेश खर्डेकर, मोहन चोपकर, विनोद शेंडे, श्रीराम राऊत, धनीराम सावरकर, अनिल बारस्कर, संगीता बारस्कर, राजीराम ईटवले, शालीक खर्डेकर, खुशराम किरणापुरे, विनायक भुसारी, वासुदेव गायधने, रुपराम इटवले आदीनी सहकार्य केले.
माळी समाजाचा स्तुत्य उपक्रम
सानगडी येथे गत तीन वर्षांपासून महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधनाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. समाजातील अंधश्रध्दा, वाईट चालीरिती यांच्यावर घाणाघाती प्रहार करुन त्या कशा चुकीच्या आहेत, हे अनेक उदाहरणाद्वारे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते दिलीप सोळके यांनी पटवून दिले.यावेळी हजारो नागरिक उपस्थित होते.