युवकांनी ऊर्जेचा सकारात्मक वापर करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:42 AM2021-02-05T08:42:04+5:302021-02-05T08:42:04+5:30

शिवतीर्थ मानव कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था खराशीच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. राष्ट्रीय, सामाजिक धार्मिक शैक्षणिक व विविध कार्यक्रमाने ही ...

Young people should use energy positively | युवकांनी ऊर्जेचा सकारात्मक वापर करावा

युवकांनी ऊर्जेचा सकारात्मक वापर करावा

Next

शिवतीर्थ मानव कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था खराशीच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. राष्ट्रीय, सामाजिक धार्मिक शैक्षणिक व विविध कार्यक्रमाने ही संस्था सुपरिचित आहे. याच अंतर्गत युवादिनाचे औचित्य साधून दिघोरी मोठी येथील हनुमान मंदिर ते खराशी, खुनारी शिवतीर्थ चुलबंद नदीघाट ते खराशी व जेवणाळा ते पालांदूर या मार्गाने युवा सद्भावना दौडचेही आयोजन करण्यात आले होते. ही दौड शिवतीर्थ मानव कल्याणकारी संस्था खराशी कार्यालयापासून ते चुलबंद नदीघाटापर्यंत घेण्यात आली. यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी युवकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपस्थित मीरा कहालकर, प्रेशिता कहालकर यांच्या सहकार्याने व्यसनमुक्त भारत तसेच व्यसनमुक्तीची प्रदर्शनी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती.

मीरा कहालकर यांनी व्यसनमुक्तीबाबत प्रबोधन केले. युवा सरपंच पंकज रामटेके, मुरलीधर कापसे, दिवाण गणपत कहालकर यांचा चषक देऊन सत्कार करण्यात आला. खुनारीचे सरपंच सेलोकर यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे बहारदार संचालन पृथ्वीराज मेश्राम यांनी तर प्रास्ताविक कहालकर गुरुजी यांनी मानले. आभार तुलसीदास कठाणे यांनी व्यक्त केले. सदर युवा जागर उपक्रमासाठी खुनारीचे सरपंच सेलोकर, दिघोरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी मडावी, पालांदूर, जेवणाळा, खराशी खुणारी, लोहारा, दिघोरी मोठी येथील नागरिकांसह विवेकानंद विद्यालय खराशी येथील विद्यार्थी व शिक्षकांनी सहकार्य केले.

Web Title: Young people should use energy positively

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.