तुमसरात मारहाणीत इसमाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2016 12:56 AM2016-10-23T00:56:34+5:302016-10-23T00:56:34+5:30

तंबाखू दिले नाही, या क्षुल्लकशा कारणावरून दोन इसमामध्ये वाद झाला. वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले.

Your death in the murder of you | तुमसरात मारहाणीत इसमाचा मृत्यू

तुमसरात मारहाणीत इसमाचा मृत्यू

Next

आरोपीला अटक : तंबाखू न दिल्याच्या कारणावरून केली आरोपीने बेदम मारहाण
तुमसर : तंबाखू दिले नाही, या क्षुल्लकशा कारणावरून दोन इसमामध्ये वाद झाला. वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री १.३० च्या सुमारास घडली. ही घटना शनिवारी सकाळ उघडकीस आली. त्यानंतर तुमसर पोलिसांनी दोन तासाच्या आता आरोपीला अटक केली.
सुधीर प्रल्हाद रामटेके (४०) रा. कुंभारेनगर असे मृत इसमाचे नाव आहे. आरोपी विकास उर्फ डबली दलिराम गिल्लोरकर (३५) रा. कुंभारेनगर हा रात्री यथेच्छ दारू पिऊन होता. रात्री १.३० वाजता तो सुधीर रामटेके यांच्या घरी गेला. मला तंबाखू दे, म्हणत त्याने सुधीरला झोपेतून उठविले. माझ्याजवळ तंबाखू नाही, असे त्याने सांगितले. तंबाखू का देत नाही म्हणून विकासने रात्रीच सुधीरशी वाद घातला. त्यानंतर सुधीरला घराबाहेर ओढत नेले. त्यानंतर त्याला बेदम मारहाण केली. मारहाणीत सुधीर गंभीररित्या जखमी झाला. सुधीरच्या कानातून रक्तस्त्राव झाला. रक्तबंबाळ स्थितीत सुधीर घरी परतला आणि भोवळ येऊन पडला. सकाळी ८ वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी सुधीर रामटेके यांची पत्नी रसिका रामटेके यांच्या तक्रारीवरून तुमसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपासाची चक्रे फिरवून तुमसर पोलिसांनी अवघ्या दोन तासात आरोपी विकास गिल्लोरकर याला अटक केली. त्याच्याविरूद्ध भादंवि ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी हे करीत आहेत.
या मारहाण प्रकरणात आणखी काही आरोपी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तुमसर शहरात मागील काही दिवसांपासून असामाजिक तत्त्वांनी डोके वर काढले आहे.
पोलीस प्रशासनाने काही जणांविरूद्ध तडीपारची कारवाई केली आहे. डिसेंबर महिन्यात नगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राहावी, यासाठी स्थानबद्धतेची कारवाई करणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Your death in the murder of you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.