आपले सरकार सेवा केंद्र ठरली डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 10:15 PM2018-11-16T22:15:18+5:302018-11-16T22:15:39+5:30

पवनी तालुक्यातील अनेक गावातील नागरीक तहसील कार्यालयात महाआॅनलाईनद्वारे प्रमाणपत्र तयार करण्यासाठी येत असतात. मात्र येथे गत पंधरा दिवसांपासून इंटरनेट सेवेत बिघाड तर, कधी मुंबईहून महाआॅनलाईन सेवेत बिघाड येत असल्याने उशिरा दाखले मिळणे सुरु आहे. त्यामुळे नागरिकांना कधी कधी आल्या मार्गाने परतावे लागत आहे.

Your government services center becomes headache | आपले सरकार सेवा केंद्र ठरली डोकेदुखी

आपले सरकार सेवा केंद्र ठरली डोकेदुखी

Next
ठळक मुद्देप्रमाणपत्रांसाठी पायपीट : चार दिवसांपासून पवनी केंद्रात बिघाड, इंटरनेट प्रणालीचा अनेकांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी/कोंढा-कोसरा : पवनी तालुक्यातील अनेक गावातील नागरीक तहसील कार्यालयात महाआॅनलाईनद्वारे प्रमाणपत्र तयार करण्यासाठी येत असतात. मात्र येथे गत पंधरा दिवसांपासून इंटरनेट सेवेत बिघाड तर, कधी मुंबईहून महाआॅनलाईन सेवेत बिघाड येत असल्याने उशिरा दाखले मिळणे सुरु आहे. त्यामुळे नागरिकांना कधी कधी आल्या मार्गाने परतावे लागत आहे.
सध्याच्या सरकारने सर्व कामे डिजीटल सेवेच्या इंटरनेटद्वारे करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना सर्व कामे संगणकाच्याद्वारे करावे लागते. श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना तसेच घरकुल योजना, कर्जमुक्ती यासह सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज करावे लागते. हीच डोकेदुखी नागरिकांना ठरली आहे. पवनी तालुक्यात महाआॅनलाईन सेवा बीएसएनएल या सरकारी कंपनीची सेवा घेऊन केले जाते. या सेवेत नेहमी बिघाड राहत असल्याने नागरिकांचे कामे वेळेवर होत नाही.
दिवाळीनंतर सोमवारपासून तहसील पवनी येथील कार्यालयात महाआॅनलाईन सेवेत बिघाड आल्याने सामान्य लोकांना त्यांच्या पाल्याकरिता प्रमाणपत्र मिळणे त्रासदायक झाले आहे. महिला, पुरुष तालुक्यातून २५ ते ३० किमी अंतरावरुन उत्पन्नाचे प्रमाणपत्र, नॉनक्रिमीलेअर, जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी येतात. येथे दिवसभर प्रतिक्षा करुन खाली हाताने त्यांना परतावे लागत आहे. त्यामुळे आॅनलाईन सेवा ही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे.
तहसील कार्यालय पवनी येथे नागरिकांच्या सेवेसाठी नायब तहसीलदार देशभ्रतार, चौधरी, तहसीलदार गजानन कोकडे तत्परतेने कामे करतात. प्रमाणपत्र लोकांना वेळेवर मिळावे म्हणून 'थम्बस' वेळेवर मारतात. परंतु कधी इंटरनेट सेवेत बिघाड, तर कधी मुंबई येथून महाआॅनलाईन सेवेत बिघाड दाखवत असल्याने प्रमाणपत्र वेळेवर मिळत नाही.
सामान्य नागरिक प्रमाणपत्र काढण्यासाठी येथे येत असतात. पण सेवेत बिघाड दाखवित असल्याने दाखल्यासाठी वाट पाहत बसावे लागत आहे.
बीएसनएल कंपनीने आपल्या सेवेत दुरुस्ती करावी. बीएसएनएलची इंटरनेटसेवा स्लोस्पीडमध्ये असल्याच्या तक्रारी आहेत. यामध्ये सरकारी कंपनीने दुरुस्ती करावी आणि सामान्य नागरिकांना होत असलेला त्रास कमी करावा, अशी मागणी प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनी केली आहे.

नागरिकांचे प्रमाणपत्र वेळेवर मिळावे, यासाठी दररोज प्रमाणपत्र 'पास' केले जाते. इंटरनेट सेवा व महाआॅनलाईन सेवेत बिघाड असल्याने लोकांना त्रास होत आहे. यामध्ये लक्ष दिले जाईल.
- गजानन कोक्कडे,
तहसीलदार, पवनी

Web Title: Your government services center becomes headache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.