‘आपले आरोग्य आपल्या हाती’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2017 12:33 AM2017-01-19T00:33:54+5:302017-01-19T00:33:54+5:30

नववर्षानिमित्त आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याच्या हेतूने नागरिकांसाठी आपले आरोग्य आपल्या हाती हा उपक्रम घेण्यात आला.

'Your Health in Your Hands' | ‘आपले आरोग्य आपल्या हाती’ उपक्रम

‘आपले आरोग्य आपल्या हाती’ उपक्रम

Next

नागरिकांची उपस्थिती : विज्ञान व अध्यात्मावर सखोल मार्गदर्शन
भंडारा : नववर्षानिमित्त आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याच्या हेतूने नागरिकांसाठी आपले आरोग्य आपल्या हाती हा उपक्रम घेण्यात आला. यात गुरूजींचा प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणृन ज्ञानेश्वर भोयर (गुरूजी) यांनी सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका अश्विनी बुरडे या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून मंदिराचे अध्यक्ष बळीराम बुरडे आदी उपस्थित होते. यावेळी ज्ञानेश्वर गुरूजी यांनी वृक्षारोपण, परिसर स्वच्छता, खादीचा वापर काळाजी गरज, जलसंवर्धन, घरच्या व्यक्तीच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी व सामाजिक बांधिलकी यांची सविस्तर माहिती दिली. आरोग्य संपन्न नागरिकांची नगरी आपली भंडारा नगरी हे उद्दिष्ट ठेवून विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी व महिलांसाठी २००२ पासून कार्यक्रम चालू आहे. आयुष्यभर आरोग्य संपन्न जीवन जगण्याचा निराधार उपस्थितांनी केला. दैनंदिन व्यवहारात दररोज व्यायाम कसा करावा याचे प्रात्यक्षिक करून दाखविले व उपस्थितांकडून करवून घेतले. वंदनीय राष्ट्रसंताच्या 'सच काम किया जग मे जिसने उसने प्रभु नाम लिया न लिया, मन पर काबू पाया है जिसने वह चारों धाम गया न गया', ‘नरदेहाची सुंदरवेळा साधूनी घे लवलाही रे मनुजा सुखकर हरीगुण गायी’ या भजनांचा आनंद उपस्थितांनी घेतला. कार्यक्रमात विज्ञान व आध्यात्म यांचा सुरेख संगम होता.
मोठ्या संख्येत नागरिकांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे संचालन मंगला कुळकर्णी, आभार प्रदर्शन इंदू भुरे यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी देवयानी हुमणे, मीना कुलरकर, अरुणा साठवणे, रेखा वासनिक, कविता पशिने, पुजा अटाळकर, निरंजना चतुर, सुनिता बोंदरे यांनी सहकार्य केले. वंदे मातरम या देशभक्तीपर गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: 'Your Health in Your Hands'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.