अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार! प्रकरणाचा तपास सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2022 21:53 IST2022-03-13T21:53:19+5:302022-03-13T21:53:43+5:30
पवनी रस्त्यावरील मोहरी फाट्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाल्याची घटना रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार! प्रकरणाचा तपास सुरू
विरली (जि. भंडारा) : लाखांदूर - पवनी रस्त्यावरील मोहरी फाट्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाल्याची घटना रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.
दितेश गुलाब गायकवाड (२५ वर्षे) रा. मोहरणा असे असून तो(दुचाकी क्र. एम. एच-३६।ए जे १३२८ )ने पवनीवरून गावाकडे येत असताना एका अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पवनी पोलीसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.