व्यसनमुक्तीसाठी युवकांनी समोर यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 11:24 PM2018-02-10T23:24:50+5:302018-02-10T23:25:17+5:30
आजची तरुण पिढी वाईट व्यसनाकडे ओढल्या जात आहे. अनेक संसार व्यसनाधीनतेमुळे उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आपला समाज व्यसनमुक्त होणे गरजेजे आहे.
आॅनलाईन लोकमत
लाखांदूर : आजची तरुण पिढी वाईट व्यसनाकडे ओढल्या जात आहे. अनेक संसार व्यसनाधीनतेमुळे उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आपला समाज व्यसनमुक्त होणे गरजेजे आहे. त्यासाठी युवकांनी यासाठी समोर येऊन व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी प्रयत्न करावे, असे मत आमदार बाळा काशिवार यांनी केले आहे. ते चिंचोली येथे भागवत सप्ताह व गोपाळकाल्याच्या कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, जि.प. सदस्य मनोहर राऊत, सरपंच मोहन सोनकुसरे, सरपंच ताराचंद मातेरे, खंडविकास अधिकारी देवरे, राहुल राऊत, ज्ञानेश्वर बुरडे, वनरक्षक मांजलवर, पत्रकार विश्वपाल हजारे, पोलीस पाटील मोहन निमजे,उपसरपंच पुरुषोत्तम रहेले, प्रकाश बारापात्रे, केशव निमजे, मुख्याध्यापक केंद्रे, राधेश्याम मुंगमोडे यांच्या सह आदी उपस्थित होते.
यावेळी काशिवार यांनी, भागवत सप्ताहातून समाजाला चांगले मार्गदर्शन मिळते अध्यात्मिकेचे धडे आजच्या पिढीत रुजले पाहिजे समाधान हे अध्यात्मातून प्राप्त होत असते. सात दिवस महाराजांनी जे आपल्या वाणीतून मार्गदर्शन केले ते खरच कौतुकास्पद आहे. त्यांच्या मागार्चे अवलंब करून समाज जीवन घडवा समाजातील सोशीत, पीडित घटकाचा विकास साधण्यासाठी आपण सदैव तत्पर आहोत असेही ते म्हणाले.
जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी, सर्व प्रगतीच्या पाठीशी सदैव नशीब असतो. त्यामुळे अध्यात्माची ओढ समाजाला लागली पाहिजे. युवकांनी पुढे येऊन लढायला शिका. व्यसनापासून दूर राहा. चांगले काम समाजासाठी करा जेणे करून आपल्या घराचा, समाजाचा विकास करण्यास अडचण येणार नाही. गरिबीतूनच खरी परीक्षा पाहता येते. भागवत सप्ताह हे समाज घडवण्यासाठी उपयोगी आहे. यातून महाराज मार्गदर्शन करतात त्याचे अवलोकन करून युवकांनी आता भविष्यात चांगली पिढी तयार करावी अशी अपेक्षा करीत असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात केले. कार्यक्रमाचे संचालन सरपंच मोहन सोनकुसरे यांनी केले. यावेळी गावातील महिला, पुरूष व बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.