युवकांनी ध्येय ठेवून वाटचाल करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 10:55 PM2017-09-18T22:55:17+5:302017-09-18T22:55:32+5:30

युवक युवतींनी अगोदर एक ध्येय समोर ठेवावे व त्यानुसार पुढील वाटचाल करावी तर यश नक्कीच प्राप्त होते. आम्हाला पुढे काय करायचे आहे,....

The youth should keep the goal and keep moving | युवकांनी ध्येय ठेवून वाटचाल करावी

युवकांनी ध्येय ठेवून वाटचाल करावी

Next
ठळक मुद्देकल्याणी भुरे : युवक युवती मार्गदर्शन, समुपदेशन कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : युवक युवतींनी अगोदर एक ध्येय समोर ठेवावे व त्यानुसार पुढील वाटचाल करावी तर यश नक्कीच प्राप्त होते. आम्हाला पुढे काय करायचे आहे, काय बनायचे आहे हे बहुतेक युवक ठरवीतच नाही व त्यामुळे ते भरकटतात व त्यांना मार्ग मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे, असे उद्गार राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष कल्याणी भुरे यांनी केले.
एन.जे. पटेल कला व वाणिज्य महाविद्यालय मोहाडी येथे युवक युवती मार्गदर्शन व समुपदेशन कार्यक्रम घेण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जेसीआय सदस्य दिपेश खंडेलवाल, प्राचार्य डॉ. विलास राणे मंचावर उपस्थित होते.
यावेळी कल्याणी भुरे यांनी, भविष्यात कोणते काम करायचे आहे, कोणत्या क्षेत्रात मला यश प्राप्त होऊ शकते हे आधी ठरवायला हवे व त्यानुसार पुढील शिक्षण पुढील वाटचाल करायला हवी तेव्हाच सर्व जीवनात सफल होऊ शकतात.
जोपर्यंत तुमचा आत्मविश्वास जागृत होणार नही तोपर्यंत तुम्ही कोणताही आव्हानाला सामोरे जाऊ शकणार नाही. मी जेव्हा अनेक मुलामुलींशी संवाद साधला तर असे लक्षात आले की त्यांना भविष्यात नेमके काय करावयाचे आहे हेच माहित नाही. तेव्हा आजच पुढे काय करायचे ते ठरवा. मनातील भीती दूर करा, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग योग्य प्रकारे करा, गुरुजनांचा, आईवडीलांचा आदर करा, शिकून नोकरी लागली नाही तर हताश न होता छोटे मोठे उद्योगधंदे सुरु करा, मुलींनीही स्वत:ला कमजोर समजू नका, आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न करा. स्वत:चे रक्षण करण्यासाठी कराटेचे प्रशिक्षण घ्या. त्यासाठी मी स्वत: मदत करायला तयार आहे असे मार्गदर्शन केले.
यावेळी दिपेश खंडेलवाल तसेच प्राचार्य डॉ. राणे यांनी कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालक प्रा. संतोष जाधव यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

Web Title: The youth should keep the goal and keep moving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.