इंटरव्हिलेज कबड्डी स्पर्धेत नवयुवक क्रीडा मंडळ अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:06 AM2021-02-06T05:06:13+5:302021-02-06T05:06:13+5:30

०४ लोक ०७ के चुल्हाड ( सिहोरा ) : चुल्हाड जिल्हा परिषद क्षेत्रातील गावांचे तरुणांकरिता माजी जिल्हा परिषद सदस्य ...

Youth Sports Board tops in InterVillage Kabaddi competition | इंटरव्हिलेज कबड्डी स्पर्धेत नवयुवक क्रीडा मंडळ अव्वल

इंटरव्हिलेज कबड्डी स्पर्धेत नवयुवक क्रीडा मंडळ अव्वल

Next

०४ लोक ०७ के

चुल्हाड ( सिहोरा ) : चुल्हाड जिल्हा परिषद क्षेत्रातील गावांचे तरुणांकरिता माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतीक्षा कटरे व मोहगाव खंदानचे सरपंच उमेश कटरे यांचे संयुक्त विद्यमाने करकापूर गावांत ओपन कबड्डी स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या स्पर्धेत वाहनीचे नवयुवक क्रीडा मंडळ अव्वल ठरले आहे. विजेत्या क्रीडा मंडळाला रोख, ट्रॉफी देण्यात आली आहे.

करकापूर गावात नवप्रभात क्रीडा मंडळाचे सहकार्याने माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतीक्षा कटरे, व मोहगाव खंदानचे सरपंच उमेश कटरे यांचे माध्यमातून ओपन कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे उदघाटन मधुकर आगाशे, दयाराम माऊले, गजानन आगाशे यांचे हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतीक्षा उमेश कटरे होत्या. यावेळी देवचंद ठाकरे, अमृत पटले, राजेंद्र ढबाले, सुकलाल सिंदपुरे, इंद्रपाल सोलंकी, गजानन लांजेवार, सरपंच प्रल्हाद आगाशे, शरद आथिलकर, भगवान सोनवणे, रवी दमाहे, विजय दमाहे, रुपचंद सातके, कैलास नागपुरे, नरेश राऊत, नरेश तीतीरमारे, शुखश्याम येळे, योगी किरणापुरे, अमृत नंदूरकर, नामदेव टांगले, श्याम बोरकर, देवानंद वासनिक, विनोद मोरे, मनोहर सिंदपुरे, कुंडल चावके, जयराम माऊले, मनोहर ठाकरे, बालू कटरे, दिनेश मेश्राम, सत्यवान शेंडे , माणिक आगाशे उपस्थित होते. दोन गटात स्पर्धा घेण्यात आली आहे.

ओपन गटात प्रथम पारितोषिक नवयुवक क्रीडा मंडळ वाहनी , द्वितीय वीर शिवाजी क्रीडा मंडळ सिंदपुरी व तृतीय पारितोषिक नवप्रभात क्रीडा मंडळ करकापूरने पटकाविला आहे, तर दुसऱ्या गटात प्रथम पारितोषिक फौजी संस्थान क्रीडा मंडळ वडेगाव, द्वितीय नवप्रभात क्रीडा मंडळ करकापूर व तृतीय संत बयाबाबा क्रीडा मंडळ केसलवाडा या चमूने पटकाविला आहे. प्रथम गटात २६ व दुसऱ्या गटात २२ चमूंनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेचे बक्षीस वितरण यासीन छवारे, नानू परमार, बोरकर यांचे हस्ते करण्यात आले. स्पर्धेला सुनील आगाशे, शरद आगाशे, निशांत मिश्रा, अविनाश सिंदपुरे, दयानंद आगाशे, लंकेश्वर वाढई, हितेश आगाशे, प्रकाश माऊले, गजानन पडोळे, रुपेश आगाशे, ताजीत आगाशे, विलास आगाशे, वैभव आथिलकर, संतोष नागपुरे, पिंटू कुकडे, नाना आगाशे, मनोज आथिलकर, समीर वाढई, पवन सिंदपुरे, जितेंद्र आगाशे, हर्षल आगाशे, जितेंद्र मेश्राम यांनी सहकार्य केले. संचालन शरद आगाशे यांनी केले.

Web Title: Youth Sports Board tops in InterVillage Kabaddi competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.